Sunny Deol Dance Video : सनी देओलची लेकाच्या लग्नात धमाल, तारा सिंगचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Iconic song From Gadar : सनीने आयकॉनिक गाणे 'मैं निकाला गड्डी लेके' डान्स केला.
Sunny Deol Viral Dance Video Karan Deol - Drisha Acharya Sangeet  Ceremony
Sunny Deol Viral Dance Video Karan Deol - Drisha Acharya Sangeet Ceremony Saam TV

Karan Deol - Drisha Acharya's Sangeet Ceremony : अभिनेता सनी देओल त्याच्या मुलाच्या लग्नमध्ये व्यस्त आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल, द्रिशा आचार्यशी लग्नबंधनात अडकणार आहे. संपूर्ण देओल कुटुंब या लग्नात सहभागी झाले आहेत. तर लग्न एन्जॉय करताना दिसतात आहेत. या सर्वांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सनी देओलच्या मुलाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला सनी देओल त्याच्या गदर मधील तारा सिंगच्या लूकमध्ये दिसला. डोक्यावर पगडी, कोट आणि सदरा - लेंगा असा अवतारात सनी देओलने सोहळ्याला हजेरी लावली होती. (Latest Entertainment News)

Sunny Deol Viral Dance Video Karan Deol - Drisha Acharya Sangeet  Ceremony
Adipurush 1st Day Collection : पहिल्याच दिवशी ‘आदिपुरुष’ हाऊसफुल्ल, इव्हनिंग- नाईट शोसाठी प्रेक्षकांची झुंबड...

सनी देओल लेकाच्या लग्नतील अनेक समारंभात अगदी उत्साहात दिसला. डान्सपासून लांब राहणार सनी देओल अनेकदा गाण्यांवर डुलताना दिसला. इतकाच नाही तर त्याने हातावर मेहेंदी देखील काढली होती. करणच्या संगीत समारंभारत सनी देओलने डान्स देखील केला. त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये सनी देओल स्टेजवर उभा होता. गाणे सुरू आल्यानंतर त्याने समोर असलेल्या नातेवाईकांना बोलावले. सनीसह सगळेजण त्याचे आयकॉनिक गाणे 'मैं निकाला गड्डी लेके' डान्स करत होते. सनी देखील लेकाच्या लग्नात स्वतःला स्टेजवर जाण्यापासून रोकु शकला नाही. त्याने या गाण्यावर दमदार डान्स केला. त्याच्या स्टेप देखील अगदी गदरमधील त्या गाण्यावर केलेल्या डान्स स्टेप सारख्याच होत्या.

करण देओलच्या संगीत समारंभारला बॉबी देओल त्याच्या पत्नीसह दिसला. धर्मेंद्र यांनी देखील सनी देओलसोबत दिसले.

सनी देओलचे लूक आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहेत. नेटकरी सनी देओलचे कौतुक करत आहेत. मुलाच्या लग्नात वडिलांनी डान्स केला याचे नेटकऱ्यांना फार कौतूक वाटत आहे. तसेच नेटकरी आणि सनी देओलचे चाहते त्याच्या गदर २ साठी उत्सुक असल्याचे देखील बोलून दाखवत आहेत.

गदर २ ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर देखील प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com