Bade Miyan Chote Miyan World Wide Day 1 Collection: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई, पाहा कलेक्शनचा आकडा

Bade Miyan Chote Miyan World Wide Box Office Collection: २०२४ मध्ये जगभरामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. नुकतंच निर्मात्यांनीच चित्रपटाच्या कमाईबद्दलची माहिती दिली आहे.
Bade Miyan Chote Miyan Box Office Collection
Bade Miyan Chote Miyan World Wide Day 1 Box Office CollectionSaam Tv

Bade Miyan Chote Miyan World Wide Day 1 Box Office Collection

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा बहुचर्चित चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बॉक्स ऑफिसवर ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त देशातच नाही तर, जगभरामध्ये दमदार कमाई केल्याचे दिसत आहे. २०२४ मध्ये जगभरामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. नुकतंच निर्मात्यांनीच चित्रपटाच्या कमाईबद्दलची माहिती दिली आहे.

Bade Miyan Chote Miyan Box Office Collection
Sankarshan Karhade: 'संकर्षणबरोबर लग्न करायचं आहे असं आईला म्हटलं...'; अभिनेत्याने सांगितला चाहतीचा ‘तो’ किस्सा

अक्षय आणि टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरामध्ये १४.६ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी ३६.३३ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल निर्मात्यांनी माहिती दिलेली आहे. टायगर आणि अक्षयच्या ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाने चांगलीच कमाई केलेली आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले. लॉकडाऊननंतर, अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते. फार मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता बॉक्स ऑफिसवर आल्यामुळे प्रेक्षक त्याच्या ह्या चित्रपटासाठी आतुर आहेत.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होती. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता होती. ॲक्शन सीन्सपासून ते मनोरंजक सस्पेन्स आणि थ्रिलरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचं तब्बल ३५० कोटींचं बजेट आहे. चित्रपटाने प्रदर्शनाआधी पासूनच जोरदार कमाई सुरू केली आहे. चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.  (Entertainment News)

Bade Miyan Chote Miyan Box Office Collection
Vitthala Tuch: माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com