Sankarshan Karhade: 'संकर्षणबरोबर लग्न करायचं आहे असं आईला म्हटलं...'; अभिनेत्याने सांगितला चाहतीचा ‘तो’ किस्सा

Sankarshan Karhade Shared Instagram Post: संकर्षण ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. यानिमित्त अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट करत एका चाहतीचा धम्माल किस्सा सांगितला आहे.
Sankarshan Karhade Share Fan Movement
Sankarshan Karhade Share Fan MovementInstagram @sankarshankarhade

Sankarshan Karhade Share Fan Movement

नाटक, मालिका आणि चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेला मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमी चर्चेत असतो. संकर्षण कायमच आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयातून चाहत्यांचे मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो. ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या तो रंगभूमीवर सक्रिय आहे. संकर्षण ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. यानिमित्ताने अभिनेत्याच्या चाहत्यांसोबत भेटीगाठी होत असतात. या दरम्यानचा किस्सा अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला.

Sankarshan Karhade Share Fan Movement
Vitthala Tuch: माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

नुकतंच संकर्षणने त्याच्या एका चाहतीबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. संकर्षण पोस्टमध्ये म्हणतो, “साताऱ्या मध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या त्यांच्याविषयी थोडं शेअर करतोय ..! वेळ असेल तर वाचा ..! त्यांनी म्हणे १२ वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवरती माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगितलं की, मला संकर्षण सोबतच लग्नं करायचंय... त्यावर बारावीतल्या त्या पोरीला आई म्हणाली; “अभ्यास करा….” पुढे त्यांचं शिक्षण झालं, लग्नं झालं, दीड वर्षांचा त्यांना मुलगा आहे आणि आता त्या सातारामध्ये असतात.. ”

“काल प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या. त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला की, बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा आणि आमची भेट झाली आणि त्यांनी मला हे सग्गळं स्वतः सांगितलं. दीड वर्षांच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेवून अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगुन गेली. कित्ती गोड आहे यार हे प्रेक्षक आणि कलाकार ह्यांच्या अनेक वर्षं एकत्रं होणाऱ्या ह्या प्रवासाचंही मला कौतुक वाटलं... त्यांना मला हे मनमोकळेपणाने सांगावं वाटलं. ह्या भावनांचंही मला फार फार कौतुक वाटलं... आणि बाळ झोपलं असेल तर त्यांना भेटून ये, बोल... हे म्हणनाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजुतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं... माझ्या नावावरुन त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूचं ठेवलंय हे तर काहीच्या काही मस्तं वाटलं... प्रेक्षकहो... असंच प्रेम करत रहा... भेटत रहा... मी जबाबदारीने काम करीन...”

Sankarshan Karhade Share Fan Movement
Emraan Hashmi And Mallika Sherawat: २० वर्षांनंतर इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत दिसले एकत्र, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आली ‘कहो ना कहो’ची आठवण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com