मराठी सिनेरसिकांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त मेजवाणी आहे. नुकताच 'झिम्मा २' चित्रपट (Jhimma 2 Movie) प्रक्षकांच्या भेटीला आला. आता या मेजवाणीचा स्वाद आणखी वाढण्यासाठी 'लंडन मिसळ' (Landon Misal Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
आतापर्यंत या चित्रपटाचे पोस्टर, टीझर रिलीज झाला होता. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. अशामध्ये आता याच चित्रपटाचा ट्रेलर (London Misal Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा फूल टू धमाल ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसत आहे.
'लंडन मिसळ' चित्रपटातल्या चटपटीत सीन्सनी आणि कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी भरलेला ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लूक्स कथेतील उत्सुकता वाढवत आहेत. तर भरत जाधव आपल्या दमदार अभिनय शैलीतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गौरव मोरे देखील आपल्या विनोदीशैलीत सर्वांना खळखळवून हसवणार असल्याचे ट्रेलर पाहून दिसून येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरच इतका भन्नाट आहे की चित्रपट किती असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
‘लंडन मिसळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये रॅप गायले आहे. ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होईल. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे. चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
'लंडन मिसळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर या चित्रपटाचे सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे. पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले आहेत. वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं 'लंडन मिसळ' चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केले आहे. चित्रपटातील गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.