अब्दुल करीम तेलगीने केलेला ‘स्कॅम २००३’ सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे. पत्रकार संजय सिंह यांच्या 'रिपोर्टर्स डायरी' या पुस्तकावर आधारित असलेल्या ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून तुफान चर्चा होत आहे. या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे, मराठी सेलिब्रिटींच्याही प्रमुख भूमिका आहेत.
शशांक केतकर (Shashank Ketkar), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari), भरत जाधव (Bharat Jadhav) आणि भावना बलसावर (Bhavana Balsavar) या कलाकारांनी वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. नुकताच अभिनेता भरत जाधव यांनी सोशल मीडियावर ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ विषयी खास स्टोरी शेअर केली आहे.
सध्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये मराठी कलाकारांचा बोलबाला दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सनेच्या ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी सेलिब्रिटी ही प्रमुख भूमिकेत दिसले होते. ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, कृतिका देव, हेमांगी कवी देखील या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसते.
नुकताच हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच वेबसीरिजची चर्चा कमी आणि मराठी सेलिब्रिटींचीच चर्चा सर्वाधिक होऊ लागली. या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत शशांक केतकर, समीर धर्माधिकारी, भरत जाधव आणि भावना बलसावर या सेलिब्रिटींनी प्रमुख भूमिका साकारली.
नुकताच भरत जाधव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी एकंदरितच भूमिकेविषयी आणि वेबसीरिजविषयी भाष्य केलंय. भरत जाधव म्हणतात, “ ‘3 लाख’ असं बोलताना मी ट्रेलर मध्ये दिसतोय. ‘scam’ या universe मधील ‘अब्दुल करीम तेलगी’ याच्या कथानकात मी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्यासमोर येतोय. तेव्हा नक्की बघा, “scam 2003, the telgi story” १ सप्टेंबर पासून, sony liv वर.”
भरत जाधव आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, “बरं.. या ‘३ लाखांचा’ reference अजून एका वेगळ्या घटनेत पण येतोय. ती घटना बघण्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल.. ‘अस्तित्व’ लवकरच रंगभूमीवर.. नव्या भूमिकेत.. नविन नाटकासह..आपलं प्रेम व आशीर्वाद सदैव सोबत राहू द्या.”
अब्दुल करीम तेलगीबद्दल सांगायचे तर, तो स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मास्टरमाईंड होता. करीमचा हा घोटाळा जवळपास १६ राज्यांमध्ये पसरलेला होता. अब्दुलने २००३ मध्ये सुमारे ३० हजार कोटींचा बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा केला होता. अब्दुल करीमचा हा घोटाळा अवघ्या जगभरात प्रसिद्ध आहे. २ सप्टेंबर २०२३ ला ही वेबसीरिज ‘सोनी लीव्ह’ (Sony Liv) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता गगन देव या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा हंसल मेहता आणि तुषार हिरनंदानी यांच्याकडे आहे. ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ ची निर्मिती समीर नायर यांच्या Applause Entertainment द्वारे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.