Baby John Released Date : 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवन डिसेंबरमध्ये गाजवणार बिग स्क्रिन

Baby John Movie : टॉलिवूड दिग्दर्शक ॲटली आता 'जवान' नंतर येत्या ख्रिसमसच्या दिवशी नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक ॲटली शाहरूख खाननंतर वरूण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
Baby John Released Date : 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवन डिसेंबरमध्ये गाजवणार बिग स्क्रिन
Baby John Released DateSaam Tv

टॉलिवूड दिग्दर्शक ॲटली आता 'जवान' नंतर येत्या ख्रिसमसच्या दिवशी नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक ॲटली शाहरूख खाननंतर वरूण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचं नाव 'बेबी जॉन' असं असून हा चित्रपट संपूर्ण जगभरात एकाच दिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुणसोबत अभिनेत्री किर्थी सुरेश हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तसेच वामिका गब्बी देखील झळकणार आहे.

Baby John Released Date : 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवन डिसेंबरमध्ये गाजवणार बिग स्क्रिन
OTT Releases This Week : OTT वर ‘या’ आठवड्यात मिळणार रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोस, एकदा लिस्ट बघाच...

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ए. कलीस्वरुन यांच्याकडे असून 'जवान' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारे ॲटली चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहेत. 'बेबी जॉन' हा ॲटली दिग्दर्शित 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये मु्ख्य भूमिकेत दक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि समांथा रुथ प्रभू होते.

डिसेंबर २०२४ मध्ये वरुण धवनच्या 'बेबी जॉन'सह बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'वेलकम ३', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर २' आणि 'मुफासा' 20 डिसेंबरला रिलीज होणार आहेत. जरीही हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत नसले तरीही या चित्रपटांची रिलीज डेट पुढे मागे आहे. 'बेबी जॉन' चित्रपटाव्यतिरिक्त वरुण धवन 'स्त्री २' , 'एक्कीस' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Baby John Released Date : 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवन डिसेंबरमध्ये गाजवणार बिग स्क्रिन
Vaastav Marathi Remake : " 'वास्तव'चा मराठी रिमेक आला तर कोणत्या कलाकारांना घेणार ?"; दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी दिली हिंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com