रिलीज आधीच प्रभास- दीपिकाच्या Kalki 2898 AD चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ॲडव्हान्स बुकिंगमधून किती केली कमाई?

Kalki 2898 AD Pri Booking Collection : प्रदर्शनाला अवघे काही दिवसच शिल्लक असून चित्रपट रिलीजच्या आधी जोरदार कमाई करताना दिसत आहे.
Kalki 2898 Ad Collection
Kalki 2898 Ad Pre Booking CollectionInstagram

‘कल्की 2898 एडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा लूक, पोस्टर, टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण हे कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या २७ जून २०२४ ला रिलीज होणार आहे. प्रदर्शनाला अवघे काही दिवसच शिल्लक असून चित्रपट रिलीजच्या आधी जोरदार कमाई करताना दिसत आहे.

Kalki 2898 Ad Collection
Happy Birthday Sai Tamhankar : आईसोबत का राहत नाही सई ताम्हणकर?; स्वत: खुलासा करत सांगितलं कारण

या बिगबजेट चित्रपटाच्या कमाईचा आलेख चढताच आहे. ६०० कोटी खर्चून बनवलेल्या ह्या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला रविवार (२३ जून)पासून सुरूवात झालेली आहे. या चित्रपटाची सोमवारपर्यंत २ कोटी ८५ लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. तर मंगळवारी हा आकडा ५ पटीने वाढला आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण १५ कोटी ७३ लाखांची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून २ दिवस बाकी आहेत, त्यामुळे हा आकडा आणखी किती वर जातो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

कमाईचा आकडा सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेला आहे. ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाला तेलुगू भाषेमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 2D आणि 3D फॉर्मेटमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. चित्रपटाने १४ कोटींची कमाई केलेली आहे. सर्वाधिक कमाई तेलुगू त्यानंतर सर्वाधिक कमाई हिंदी आणि तमिळ भाषेतील आहे. रिपोर्टनुसार, प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण स्टारर चित्रपटाने आतापर्यंत प्री- बुकिंगमध्ये तब्बल १५ कोटी ७३ लाख रुपयांची कमाई केली आहे. आत्तापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाची ही कमाई निश्चित आहे. आतापर्यंत चित्रपटाची ५ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

Kalki 2898 Ad Collection
Sonakshi Sinha Marriage : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ कुठे होते?, लव्ह सिन्हाने सांगितलं बहिणीच्या लग्नाला न येण्यामागचं कारण...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com