Deepika Padukone: आलिया, प्रियांकाला मागे टाकत दीपिका ठरली २०२४ ची सर्वात महागडी अभिनेत्री; एका चित्रपटासाठी घेते इतक्या कोटींचे मानधन

Deepika Padukone News: दीपिका पदुकोन ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री आता २०२४ या वर्षातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
Deepika Padukone
Deepika PadukoneSaam Tv

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दीपिका पदुकोन. दीपिका ही नेहमीच चर्चेत असते. दीपिका लवकरच गूड न्यूज देणार आहे. दीपिका- रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दीपिकाची चर्चा होत आहे. दीपिकाच्या अभिनयाचे चाहते भरभरुन कौतुक करत असतात. अशातच इंटरनेट मुव्ही डेटाबेसनुसार, दीपिका ही २०२४ मधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

दीपिका पदुकोनने कंगना रणौत, प्रियांका चोप्रा आणि आलिया भटला मागे टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका या सर्व आघाडीच्या अभिनेत्रींपैकी जास्त मानधन घेते. दीपिका एका चित्रपटासाठी जवळपास १५-३० कोटी रुपयांचे मानधन घेते.

दीपिकानंतर अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगणा रणौत या एका चित्रपटासाठी १५-२७ कोटी रुपयांचे मानधन घेतात. प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिसऱ्यां क्रमांकावर आहे. या दोन्ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी १५-२५ कोटी रुपयांचे मानधन घेतात. तर आलिया भट्ट एका चित्रपटासाठी १०-२० कोटी रुपयांचे मानधन आकारते. करिना कपूर एका चित्रपटासाठी ८-१८ कोटी रुपयांचे मानधन घेते. तर श्रद्धा कपूर ७-१५ कोटी रुपयांचे मानधन आकारते. विद्या बालन ८-१४ कोटी रुपयांचे मानधन घेते.

Deepika Padukone
Ankush Choudhary : अंकुश चौधरीने खास मुंबईकरांसाठी केली नव्या नाटकाची घोषणा, 'तोडी मिल फॅन्टसी' चा प्रयोग कधी?

दीपिका पदूकोन नेहमीच ब्लॉकबस्टर चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर दीपिका आता 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसणार आहे. तर 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Deepika Padukone
Sarfira Trailer : खिशात एकही रुपया नसताना आकाशाला गवसणी घालणाऱ्या जेंटलमनची गोष्ट, 'सरफिरा'चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com