Sarfira Trailer : खिशात एकही रुपया नसताना आकाशाला गवसणी घालणाऱ्या जेंटलमनची गोष्ट, 'सरफिरा'चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज

Sarfira Trailer Out : इमोशन्स आणि प्रेरणादायी कथानकाने प्रेरित असलेल्या या चित्रपटाचे गेल्या काही दिवसांपासून चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Sarfira Trailer : खिशात एकही रुपया नसताना आकाशाला गवसणी घालणाऱ्या जेंटलमनची गोष्ट, 'सरफिरा'चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज
Sarfira Trailer Saam Tv

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कायमच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट रिलीज झाला. आता त्यानंतर अक्षय कुमारचा नवा चित्रपट रिलीज होतोय. लवकरच अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपट रिलीज होणार आहे. इमोशन्स आणि प्रेरणादायी कथानकाने प्रेरित असलेल्या या चित्रपटाचे गेल्या काही दिवसांपासून चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Sarfira Trailer : खिशात एकही रुपया नसताना आकाशाला गवसणी घालणाऱ्या जेंटलमनची गोष्ट, 'सरफिरा'चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज
Anant- Radhika 2nd Pre Wedding : अनंत- राधिका यांचे दुसऱ्या प्री- वेडिंगमधील रोमँटिक फोटो व्हायरल, पोजेसची होतेय चर्चा

अक्षयने सोशल मीडियावर 'सरफिरा' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केलेला आहे. "स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत, अशीच एक स्वप्न कथा आहे सरफिरा, सरफिरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज" असं कॅप्शन देत अभिनेत्याने ट्रेलर शेअर केलेला आहे. चित्रपटाचे कथानक स्टार्ट अप बिझनेस आणि एअरलाईनवर आधारित आहे. जर तुमच्याकडे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुम्ही ते कशा प्रकारे पूर्ण करू शकता हे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल.

ट्रेलरमध्ये परेश रावल हे परेश गोस्वामी या भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये दिसतंय की, खिशात एक रुपया असताना आकाशात उंचच उंच भरारी घेण्याचे सर्वसामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय धडपड करतो. चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या डोक्यात नेमक्या कोणत्या बिझनेस आयडिया आहेत. याचं उत्तर आपल्याला चित्रपटामध्येच मिळेल.

'सरफिरा' मध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमारसह परेश रावल, राधिका मदन, आर. सरथ कुमार आणि सीमा बिस्वास हे कलाकार आहेत. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री इरावती हर्षे ही मुख्य भूमिकेत आहेत. 'ओएमजी' नंतर अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकदा या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. 'सराफिरा' चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा करत असून १२ जुलैला 'सरफिरा' थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Sarfira Trailer : खिशात एकही रुपया नसताना आकाशाला गवसणी घालणाऱ्या जेंटलमनची गोष्ट, 'सरफिरा'चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज
Kangana Ranaut House Gift : बहीण असावी तर कंगनासारखी, चुलत भावाला लग्नात दिलं खास गिफ्ट; पाहा PHOTO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com