LSG vs MI, IPL 2024: मुंबईच्या पराभवानंतर इरफान पठाण हार्दिकवर भडकला! परखड वक्तव्य करत म्हणाला...

Irfan Pathan On Hardik Pandya: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
irfan pathan slams hardik pandya after mumbai indians defeat in lsg vs mi match amd2000
irfan pathan slams hardik pandya after mumbai indians defeat in lsg vs mi match amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा हा या हंगामातील सातवा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने देखील परखड भाष्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटक अखेर १४४ धावा करता आल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना हवी तशी सुरुवात करून देता आली नाही. शेवटी टीम डेव्हिड आणि नेहाल वढेराने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या १४४ पर्यंत पोहचवली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने १९.२ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. ज्यात मार्कस स्टोइनिसच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. तर केएल राहुल आणि निकोलस पुरन यांनी शानदार सुरुवात करून दिली.

irfan pathan slams hardik pandya after mumbai indians defeat in lsg vs mi match amd2000
IPL 2024 Playoffs: इंग्लंडच्या या एका निर्णयाने IPL च्या ५ संघांचं टेन्शन वाढलं; वाचा कारण

इरफान पठाण काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीनंतर इरफान पठाणने आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, ' गतवर्षी मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी जसप्रीत बुमराह नव्हता. मात्र यावेळी तो संघात असूनही संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आलेला नाही. मैदानावरील मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे. हेच सत्य आहे.' असं इरफान पठाण म्हणाला आहे.

irfan pathan slams hardik pandya after mumbai indians defeat in lsg vs mi match amd2000
Brian Lara On Mumbai Indians: मुंबईचं नेमकं चुकतंय तरी कुठं? ब्रायन लाराने स्पष्टच सांगितलं

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाने मोठा निर्णय घेतला होता. संघाची जबाबदारी रोहित शर्मा कडून काढून घेतली आणि हार्दिक पंड्याकडे सोपवली. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल देखील केलं गेलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने १० पैकी ७ सामने गमावले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com