आयपीएल २०२४ स्पर्धेतील २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने २० षटकअखेर ४ गडी बाद २०६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १८६ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्स संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र त्याची खेळी व्यर्थ गेली. दरम्यान या पराभवानंतर वेस्टइंडिजचे माजी खेळाडू ब्रायन लारा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
ब्रायन लारा म्हणाले की, ' मुंबई इंडियन्सचा संघ हा अनेकांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार वाटतो. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची फलंदाजी. मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात २४६ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १९६ धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. हे पाहता आम्ही चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची विजेता म्हणून निवड केली होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी निराश केलं. मुंबईचं गोलंदाजी आक्रमण पाहिलं, तर जसप्रीत बुमराहला इतर कुठल्याच गोलंदाजाकडून सपोर्ट मिळत नाही. सीएसकेच्या फलंदाजांनी या गोलंदाजांना चांगलाच चोपला.'
तसेच ते पुढे म्हणाले की, 'मुंबई इंडियन्स संघाने आपल्या फिरकी गोलंदाजांवर विश्वास दाखवला नाही. शिवम दुबे फलंदाजी करत असताना त्यांनी फिरकी गोलंदाजांना केवळ ४ षटक गोलंदाजी करु दिली. इथे मुंबई इंडियन्सला सुधारणा करावी लागेल. जर तुमच्याकडे चेन्नई सुपर किंग्ज संघासारखा गोलंदाजी क्रम असेल तर तु्म्ही सामन्यात कुठल्याही क्षणी आघाडी घेऊ शकता. तुम्ही जर चेन्नईच्या गोलंदाजांकडे पाहिलं, तर प्रत्येक गोलंदाजाने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ज्यावेळी मुंबईचे फलंदाज धावांची गती वाढवणार होते, नेमकं त्याचवेळी चेन्नईच्या गोलंदाजांनी डॉट चेंडू टाकले.'
'हार्दिक पंड्याला या सामन्यात अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या गोलंदाजीवर शेवटच्या ४ चेंडूत ३ षटकार मारले गेले. मुंबईला असे गोलंदाज शोधून काढावे लागतील जे मॅचविनर असतील.' असं ब्रायन लारा म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.