Hardik Pandya Step Brother: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक,काय आहे प्रकरण?

Police Arrested Hardik Pandya's Step Brother: भारतीय क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Mumbai Indians captain Hardik Pandya step brother arrested by Mumbai police Eow department
Mumbai Indians captain Hardik Pandya step brother arrested by Mumbai police Eow departmentyandex

(सचिन गाड)

Hardik Pandya Step Brother Arrested:

भारतीय क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) ही कारवाई केलीय. (Latest News)

हार्दिक आणि त्याच्या भावाला फसवल्याप्रकरणी वैभव पांड्याला अटक करण्यात आलीय. दरम्यान हार्दिक पांड्या आणि त्यांच्या भावाने सावत्र भाऊ वैभव पांड्यासोबत पार्टनरशीपमध्ये पॉलिमर व्यवसाय सुरू केला. यातून वैभवने ४.३ कोटी रुपये वळवण्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसायात गुंतवणूक केली होती. हार्दिक आणि त्यांच्या प्रत्येकी ४० टक्के गुंतवणूक यात होती.

तर या गुंतवणुकीत सावत्र भावाचा २० टक्के वाटा होता. या व्यवसायातून येणऱ्या फायद्याचं तिन्ही भावांमध्ये या शेअर्सनुसार नफा वाटला जाणार होता. परंतु हार्दिकच्या सावत्र भाऊ वैभवने त्याच्या सावत्र भावांना न कळवता त्याच व्यापारात दुसरी फर्म स्थापन केल्याची कथित माहिती आहे, अशाप्रकारे भागीदारी मोडली. यामुळे मूळ भागीदारीतील नफा कमी झाला, यात ३ कोटींचे नुकसान झाले.

तसेच वैभवने गुपचूप स्वतःच्या नफ्याचा हिस्सा २०ट्क्के वरून ३३.३ टक्केपर्यंत वाढवला. यामुळे हार्दिक आणि क्रुणाल पांड्या यांच्या आर्थिक नुकसान झाले आहे. या कृत्यांसंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वैभव पांड्यावर फसवणूक केल्याचा आरोप केलाय. दरम्यान क्रिकेटमध्ये नावलौकिक कमवलेल्या पांड्या बंधूंनी या प्रकरणावर जाहीरपणे भाष्य केलेले नाही.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचा भाग आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो प्रभावी कामगिरी करताना दिसत आहे. दरम्यान २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिकला पायाला दुखपत झाली होती. या दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. परंतु त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

कर्णधार हार्दिक पांड्यासाठी यंदाचा हंगाम खूप खडतर राहिलाय. गेल्या आठवड्यात एमआयने दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदवण्यापूर्वी सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले.

Mumbai Indians captain Hardik Pandya step brother arrested by Mumbai police Eow department
Hardik Pandya: सलग ३ पराभवानंतर MIच्या कर्णधाराला आठवला 'भोलेनाथ'; हार्दिकने महादेवाला घातलं दुग्धाभिषेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com