Jasprit Bumrah Record: नाद करा पण बुमराहचा कुठं! RCB विरुद्ध असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

Jasprit Bumrah Record Against RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड दाखवला आहे.
Jasprit Bumrah Record: नाद करा पण बुमराहचा कुठं! RCB विरुद्ध असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
MI vs RCB 2024 Jasprit bumrah becomes the only bowler to took 5 wicket hauls against rcb in ipl history amd2000twitter

Jasprit Bumrah Record, MI vs RCB IPL 2024:

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे .

या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून जसप्रीत बुमराह हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या डावात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात ५.२५ च्या इकोनॉमीने अवघ्या २५ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध खेळताना ५ गडी बाद करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली आहे. मात्र कुठल्याच गोलंदाजाला ५ गडी बाद करता आले नव्हते.

Jasprit Bumrah Record: नाद करा पण बुमराहचा कुठं! RCB विरुद्ध असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
MI vs RCB, IPL 2024: बुमराहच्या गोलंदाजीवर किंग कोहलीची बत्ती गुल ! इशानचा भन्नाट कॅच, पाहा Video

जसप्रीत बुमराहने या डावाच्या सुरुवातीलाच विराट कोहलीला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर त्याने फाफ डू प्लेसिस,महिपाल लोमरोर, सौरव चौहान, विजयकुमार विश्याक यांना बाद करत माघारी धाडलं. या दरम्यान दोनदा त्याला हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. यासह त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. बुमराहने आतापर्यंत या स्पर्धेत १० गडी बाद केले आहेत. (Cricket news in marathi)

Jasprit Bumrah Record: नाद करा पण बुमराहचा कुठं! RCB विरुद्ध असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
MI vs RCB, IPL 2024: एकटा बुमराह नडला, पण RCB ने झोडलं ; मुंबई इंडियन्सला १९७ धावांचं भलं मोठं टार्गेट

मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना इशान किशन आणि रोहित शर्माच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून संघासाठी १०१ धावांची सलामी दिली. रोहितने २४ चेंडूंचा सामना करत ३८ धावांची खेळी केली.तर इशान किशनने वादळी खेळी करत ३४ चेंडूंचा ७ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ६९ धावांची खेळी केली. शेवटी सूर्यकुमार यादवने अवघ्या १९ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची तुफानी खेळी केली. शेवटी हार्दिक पंड्याने महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com