MI vs RCB, IPL 2024: बुमराहच्या गोलंदाजीवर किंग कोहलीची बत्ती गुल ! इशानचा भन्नाट कॅच, पाहा Video

Virat Kohli- Jasprit Bumrah: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.
mi vs rcb ipl 2024 jasprit bumrah took virat kohli wicket ishan kishan catch amd2000
mi vs rcb ipl 2024 jasprit bumrah took virat kohli wicket ishan kishan catch amd2000twitter

Virat Kohli Wicket On Jasprit Bumrah Bowling:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराट कोहली मोठी खेळी करणार असं फॅन्सला वाटलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने त्याला स्वस्तात माघारी धाडलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

किंग कोहली स्वस्तात माघारी..

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. क्रिकेट चाहत्यांना वाटलं होतं की,जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल असं वाटलं होतं. मात्र बुमराहने त्याला आपल्या पहिल्याच वैयक्तिक षटकात बाद करत माघारी धाडलं. विराट या डावात ३ धावा करत माघारी परतला.

mi vs rcb ipl 2024 jasprit bumrah took virat kohli wicket ishan kishan catch amd2000
IPl 2024: युजवेंद्र चहलने रचला इतिहास; मोडला शेन वॉर्नचा १३ वर्ष जुना विक्रम

तर झालं असं की, मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी सुरु असताना जसप्रीत बुमराह तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी विराट कोहली ८ चेंडू खेळून ३ धावांवर फलंदाजी करत होता.

बुमराहने ऑफ स्टम्पच्या दिशेने चेंडू टाकला तो टप्पा पडून आत आला आणि बॅटची कडा घेत मागे गेला. यष्टीरक्षण करत असलेल्या इशान किशनने कुठलीही चुक न करता डाव्या बाजुला डाइव्ह मारली आणि भन्नाट झेल टिपला. विराट कोहली बाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Cricket news in marathi)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११..

रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्जी, श्रेयस गोपाल, , आकाश मधवाल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेइंग इलेव्हन – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), विजयकुमार वैश्याक, मोहम्मद सिराज, आकाश दीप, महिपाल लोमरोर, रीस टोप्ली.

mi vs rcb ipl 2024 jasprit bumrah took virat kohli wicket ishan kishan catch amd2000
IPL 2024 | Sanju Samson Fined: अंपायरवर गिल भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com