IPl 2024: युजवेंद्र चहलने रचला इतिहास; मोडला शेन वॉर्नचा १३ वर्ष जुना विक्रम

Yuzvendra Chahal : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या सामन्यात लेगस्पिनर युजवेंद्र चहलने मोठी कामगिरी केलीय. या सामन्यात चहलने ४षटकात ४३ धावा देत २ बळी घेतले.
Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal Record In IPLx ipl
Published On

Yuzvendra Chahal Record In IPL :

भारतीय संघाचा डावखुरा फिरकीपटू युजवेंद्र चहलने इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात एक विक्रम केलाय. या हंगामात चहल राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव जरी झाला असला तरी युजवेंद्र चहल याने चांगली कामगिरी करत एक विक्रम केलाय. यंदाच्या आयपीएलमध्ये चहलने चांगली कामगिरी केली आहे. यात त्याने ५ सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. (Latest News)

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर १० एप्रिल रोजी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने ४ षटकात ४३ धावा दिल्या. पण त्याचबरोबर त्याने २ विकेट्सही घेतल्या. या दोन विकेट घेताच चहलने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार शेन वॉर्नचा १३ वर्षे जुना विक्रमही मोडला.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात २ विकेट्स घेत युजवेंद्र चहल आता आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत चहल तिसऱ्या क्रमांकावर आहे. चहल २०२२ च्या आयपीएल हंगामात राजस्थान संघाचा भाग बनला, तेव्हापासून त्याने ३६ सामने खेळताना राजस्थानसाठी ५८ बळी घेतले आहेत.

तर २००८ ते २०११ या काळात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून खेळलेल्या शेन वॉर्नने ५५ सामन्यात ५७ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या सिद्धार्थ त्रिवेदीच्या नावावर आहे. त्याने ७६ सामन्यांमध्ये ६५ बळी घेतले आहेत. दुसऱ्या स्थानावर शेन वॉटसनचे नाव आहे त्याने ७८ सामन्यात ६१ विकेट घेतल्या आहेत.

चहल २०० विकेट्सपासून फक्त ३ पावले दूर

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यामध्ये युजवेंद्र चहल सध्या पहिल्या स्थानावर आहे. त्याने १५० सामने खेळताना २१.२५ च्या सरासरीने १९७ विकेट्स घेतल्या आहेत. आता चहल आयपीएलमध्ये २०० विकेट पूर्ण करण्याच्या आकड्यापासून फक्त ३ पावले दूर आहे. चहल जर ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर तो आयपीएलमध्ये हा इतिहास रचणारा पहिला खेळाडूही ठरणार आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचा पुढचा सामना १३ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध असणार आहे.

Yuzvendra Chahal
IPL 2024 | Sanju Samson Fined: अंपायरवर गिल भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com