IPL 2024 | Sanju Samson Fined: अंपायरवर गिल भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं कारण काय?

Sanju Samson Fined By BCCI | IPL 2024 News in Marathi: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ व्या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
IPL 2024 | Sanju Samson Fined: शुभमन गिल अंपायरवर भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं कारण काय?
Sanju Samson Fined By Bcci For Slow Over-rate During Rajasthan Royals Vs Gujarat Titans Matchtwitter

Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ व्या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने शानदार खेळ करत राजस्थान रॉयल्स संघावर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. दरम्यान या पराभवानंतर राजस्थान रॉयल्स संघावर बीसीसीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राजस्थान रॉयल्स हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने सुरुवातीचे चारही सामने जिंकले. मात्र बुधवारी झालेल्या सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसनवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. (Cricket News in marathi)

IPL 2024 | Sanju Samson Fined: शुभमन गिल अंपायरवर भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं कारण काय?
RR vs GT, IPL 2024: सॅमसन -परागचा गुजरातवर हल्ला बोल! विजयासाठी ठेवलं १९७ धावांचं आव्हान

काय आहे कारण?

या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाज निर्धारित षटक आपल्या वेळेत पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार संजू सॅमसनवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर संजू सॅमसनने आपली चूक मान्य केली आहे. ही त्याची या हंगामातील पहिलीच चूक असल्याने १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

IPL 2024 | Sanju Samson Fined: शुभमन गिल अंपायरवर भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं कारण काय?
IPL 2025 AuctionL: IPL मध्ये रिटेन खेळाडूंची संख्या वाढणार? ठेवता येणार इतके खेळाडू

राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव..

राजस्थान रॉयल्स संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. सलग ४ विजयानंतर अखेर गुजरात टायटन्सकडून राजस्थानचा विजयरथ थांबवण्यात आला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने १९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com