आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा विजयरथ थांबवत ३ गडी राखून शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद १९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने १९९ धावा करत सामना जिंकला. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसनने पराभवाचं कारण सांगितलं.
हा सामना झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनला पराभवाचं कारण विचारण्यात आलं, त्यावेळी तो म्हणाला की, ' मला वाटतं की, आम्ही सामन्यातील शेवटच्या चेंडूवर पराभूत झालो. आता काहीही सांगणं खूप कठीण आहे. मला असं वाटतं, सामना झाल्यानंतर पराभव कुठे झाला हे सांगणं जास्त कठीण असतं. मी या भावनेतून बाहेर पडल्यानंतर स्पष्टपणे सांगू शकेल.'
तसेच तो पुढे म्हणाला की, ' गुजरात टायटन्स संघाला विजयाचं श्रेय द्यावं लागेल. हेच या स्पर्धेचं वैशिष्ठ्य आहे. आम्हाला शिकावं लागेल आणि पुढे निघावं लागेल. मी जेव्हा फलंदाजी करत होतो त्यावेळी मला १८० धावा खूप वाटल्या होत्या. १९६ धावा तर सामना जिंकण्यासाठीचं आव्हान होतं.'
राजस्थानचा या हंगामातील पहिलाच पराभव..
राजस्थान रॉयल्स संघाने या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या संघाने सुरुवातीच्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या संघाने लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केलं. मात्र आता राजस्थान रॉयल्स संघाला गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.