RR vs GT, IPL 2024: सॅमसन -परागचा गुजरातवर हल्ला बोल! विजयासाठी ठेवलं १९७ धावांचं आव्हान

Rajasthan Royals vs Gujarat Titans 1st Inning: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे.
RR vs GT, IPL 2024: सॅमसन -परागचा गुजरातवर हल्ला बोल! विजयासाठी ठेवलं १९७ धावांचं आव्हान
RR vs GT IPL 2024 Rajasthan royals vs gujarat titans live updates amd2000twitter
Published On

RR vs GT 1st Inning Update:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये सुरू आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे सामन्याला उशीर झाला. दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी पावसाच्या सरी बरसल्या. तर सामना सुरू झाल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. या सामन्यातील पहिल्या डावात राजस्थान रॉयल्स संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद १९६ धावा करत गुजरातसमोर विजयासाठी १९७ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांची जोडी मैदानावर आली होती. मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही.

RR vs GT, IPL 2024: सॅमसन -परागचा गुजरातवर हल्ला बोल! विजयासाठी ठेवलं १९७ धावांचं आव्हान
IPL 2025 AuctionL: IPL मध्ये रिटेन खेळाडूंची संख्या वाढणार? ठेवता येणार इतके खेळाडू

जयस्वाल २४ धावांवर तर जोस बटलर अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या संजू सॅमसन आणि रियान परागने मिळून शतकी भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या १९६ धावांवर पोहचवली. या डावात रियान परागने ४८ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने ३८ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची खेळी केली.

RR vs GT, IPL 2024: सॅमसन -परागचा गुजरातवर हल्ला बोल! विजयासाठी ठेवलं १९७ धावांचं आव्हान
IPL 2024: वानिंदु हसरंगाच्या रिप्लेसमेंटची घोषणा! या स्टार खेळाडूला मिळाली संधी

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान,शिमरॉन हेटमायर, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स – शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, राशिद खान, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com