IPL 2024: वानिंदु हसरंगाच्या रिप्लेसमेंटची घोषणा! या स्टार खेळाडूला मिळाली संधी

Wanindu Hasaranga Replacement: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान झालेल्या मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. दरम्यान आता त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे.
IPL 2024 SRH announced replacement of wanindu hasaranga vijaykanth viyaskanth amd2000
IPL 2024 SRH announced replacement of wanindu hasaranga vijaykanth viyaskanth amd2000twitter

Wanindu Hasaranga Replacement, SRH:

आयपीएल २०२४ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचा आतापर्यंतचा प्रवास रोलर कोस्टर राईडसारखा राहिला आहे. स्पर्धा सुरु असतानाच संघाला मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू वानिंदु हसरंगाला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान झालेल्या मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. दरम्यान आता त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे.

कोणाला मिळालं स्थान?

वानिंदु हसरंगा हा संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू होता. मात्र तो दुखापतीमुळे या स्पर्धेतील एकही सामना खेळू शकला नाही. त्यानंतर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याच्याऐवजी २२ वर्षीय विजयकांत व्यासकांतचा संघात समावेश करण्यात आला आहे. सनरायझर्द हैदराबादने वानिंदु हसरंगाला १.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेल्या विजयकांत व्यासकांतचा ५० लाखांच्या बेस प्राईजवर संघात समावेश करण्यात आला आहे.

IPL 2024 SRH announced replacement of wanindu hasaranga vijaykanth viyaskanth amd2000
IPL 2024, PBKS Vs SRH: पंजाब किंग्स हैदराबादला देणार का मात? दोन्ही संघात कोण राहिलंय वरचढ?

कोण आहे विजयकांत?

वानिंदु हसरंगा बाहेर पडल्यानंतर त्याच्याऐवजी श्रीलंकेच्या खेळाडूलाच संघात स्थान दिलं गेलं आहे. विजयकांतने २०२३ मध्ये श्रीलंकेसाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. नुकताच पार पडलेल्या आयएल टी-२० लीग स्पर्धेत त्याने लक्षवेधी कामगिरी केली होती. या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये त्याने ८ गडी बाद केले होते. यासह बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आता आयपीएल स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Cricket news in marathi)

IPL 2024 SRH announced replacement of wanindu hasaranga vijaykanth viyaskanth amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईच्या विजयानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११...

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com