Hardik Pandya Viral Video: Mumbai Indians चा कॅप्टन हार्दिक पांड्या झाला गायक, श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन; Video Viral

Hardik Pandya And Krunal Pandya Viral Video: आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या खूप जास्त चर्चेत आहे. हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Hardik Pandya Viral Video
Hardik Pandya Viral VideoSaam Tv

MI Captain Hardik Pandya And Krunal Pandya Sing Bhajan Viral Video:

देशाल सध्या आयपीएल सुरु आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या खूप जास्त चर्चेत आहे. हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्याचे अनेक क्रिकेटप्रेमींना फारसे आवडले नाही. त्यामुळे त्याच्यावर अनेक टीका होताना दिसत आहे. अशातच हार्दिक पांड्या हरे क्रिष्णा, हरे रामाच्या भजनात दंग असल्याचे दिसत आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Viral News In Marathi)

हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्या आणि भाऊ कृणाल पंड्या भजन गाताना दिसत आहे. हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हातात माइक घेऊन हरे क्रिष्णा, हरे रामा हे भजन गाताना दिसत आहे. हार्दिक आणि कृणालने त्यांच्या घरात भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. याचदरम्यान ते कृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओ हार्दिकच्या घरी भजनीमंडळ आल्याचेदेखील दिसत आहे. तसेच हार्दिक पंड्याची बायको आणि मुलगादेखील क्रिष्णाच्या भजनात दंग झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमुळे हार्दिक पंड्या चांगलाच चर्चेत आला आहे.

Hardik Pandya Viral Video
Dog Attack Video: भटक्या कुत्र्याचा १५ वर्षीय मुलावर हल्ला; थरारक VIDEO व्हायरल

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या मॅचआधी हार्दिक पंड्याने सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्स मॅच जिंकली होती. त्यानंतर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hardik Pandya Viral Video
Viral Video: बापरे! बॉसच्या त्रासाला कंटाळले, थेट गुंडाना सुपारी देऊन भररस्त्यात धु धु धुतलं; धक्कादायक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com