Viral Video: बापरे! बॉसच्या त्रासाला कंटाळले, थेट गुंडाना सुपारी देऊन भररस्त्यात धु धु धुतलं; धक्कादायक VIDEO

Viral Video: नेकदा कर्मचारीही संतापतात, आपला राग व्यक्त करतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही तरुणांनी बॉसला थेट मारहाण केल्याचे दिसत आहे.
Viral Video News
Viral Video NewsSaamtv

Viral Video News:

खासगी कंपनीमध्ये काम करताना अनेकदा बॉसची बोलणी, कामाचा ताण, अतिरिक्त काम करावे लागते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी, जॉब टिकवण्यासाठी या सर्व गोष्टी सहन करुन प्रत्येकजण आपले काम सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अनेकदा कर्मचारीही संतापतात, आपला राग व्यक्त करतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही तरुणांनी बॉसला थेट मारहाण केल्याचे दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

ही संपूर्ण घटना बेंगळूरमधील आहे. सुरेश असे या मारहाण झालेल्या बॉसचे नाव असून तो डेअरी प्रोडक्ट्स कंपनी या खासगी फर्ममध्ये ऑडिटर आहे. कल्याण नगरजवळील रिंग रोडवर त्याच्यावर काही तरुणांनी हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओ माध्यांवर व्हायरल झाला होता. याबाबत बॉसने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

व्हिडिओ (Viral Video) समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करत संबंधित तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्याने आपल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. यावेळी त्यांनी बॉस कामाच्या ठिकाणी त्रास देत असल्याने गुंडांकडून मारहाण करायला सांगितल्याचे आरोपींनी म्हटले आहे.

Viral Video News
Lok Sabha Election 2024: 'भाजपमध्ये जाऊन माझ्या मुलाने चूक केली, त्याचा पराभव झालाच पाहिजे,' काँग्रेस नेत्याचे मोठं वक्तव्य

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भररस्त्यात काही तरुण बॉसला मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण सुरू असताना रस्त्यावर गाड्यांची ये- जा सुरू असल्याचेही दिसत आहे. मात्र कोणीही हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video News
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तुरुंगातच, दिल्ल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com