Lok Sabha Election 2024: 'भाजपमध्ये जाऊन माझ्या मुलाने चूक केली, त्याचा पराभव झालाच पाहिजे,' काँग्रेस नेत्याचे मोठं वक्तव्य

A. K. Antony Criticized BJP: 'आपल्या मुलाचा पराभव झाला पाहिजे.', असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटोनी (A. K. Antony) यांनी केले आहे. मुलाच्या पराभवासाठी प्रयत्न करणाऱ्या ए के अँटोनी यांचे हे वक्तव्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
A. K. Antony Criticized BJP
A. K. Antony On Anil AntonySaamTv
Published On

A. K. Antony On Anil Antony:

देशभराध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून या पक्षांकडून प्रचार सभा, बैठका आणि कार्यकर्ता मेळावे सुरू आहेत. अशामध्ये काँग्रेसच्या (Congress) एका बड्या नेत्याने सध्या धक्कादायक विधान केले आहे. 'आपल्या मुलाचा पराभव झाला पाहिजे.', असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटोनी (A. K. Antony) यांनी केले आहे. मुलाच्या पराभवासाठी प्रयत्न करणाऱ्या ए के अँटोनी यांचे हे वक्तव्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के अँटनी यांनी मंगळवारी आपल्या मुलाविरोधात वक्तव्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री ए के अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने अनिल अँटोनी यांना केरळच्या पठाणमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आपल्या मुलावर निशाणा साधत ए.के.अँटोनी म्हणाले की, 'आपल्या मुलाला निवडणुकीत पराभूत करणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या भाजप पक्षाला पराभूत व्हावे लागेल.', असे ते म्हणाले.

A. K. Antony Criticized BJP
Rajeev Kumar: IBच्या रिपोर्टनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सुरक्षेत वाढ, राजीव कुमार यांना मिळाली Z दर्जाची सुरक्षा

ए के अँटोनी पुढे म्हणाले की, 'दक्षिण केरळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे अँटो अँटोनी जिंकले पाहिजेत. काँग्रेस हा आपला धर्म आहे. आपल्या मुलाने भाजपमध्ये जाऊन चूक केली.' अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. 'इंडिया आघाडी पुढे जात आहे. भाजपा आता खाली जात आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी आहे. आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात सतत लढत आहे.' असं देखील ए के अँटोनी यांनी सांगितले.

A. K. Antony Criticized BJP
Chandrashekhar Bawankule: ४ जूननंतर घरात बसून राहण्याचं काम करावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

अनिल अँटोनी यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. 2002 च्या गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून झालेल्या वादानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडला होता. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अनिल अँटोनी हे तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. अनिल अँटोनी यांनी 2007 मध्ये तिरुअनंतपुरममधील इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर मास्टर्स करण्यासाठी ते यूएसला गेले. अनिल यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून विज्ञान आणि इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

A. K. Antony Criticized BJP
Vasant More On MNS Melava: काही आठवणी कधीच बुडत नाहीत, वसंत मोरेंना येतेय मनसेच्या मेळाव्याची आठवण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com