देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने (Election Commision) निवडणुकांच्या तारखांची घोषणा केल्यापासून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajeev Kumar) यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आयबीच्या रिपोर्टनंतर राजीव कुमार यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात गृह मंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना गृह मंत्रालयाने सुरक्षा वाढवून दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष यावेळी गोंधळ घालत आहेत. हे लक्षात घेऊन आयबीच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्ट आला आहे. त्या रिपोर्टच्या आधारावर मुख्य निवडणूक आयुक्तांना सुरक्षा वाढवून देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने राजीव कुमार यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.
सध्या राज्यासह देशामध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. देशातमध्ये यंदा ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्याची मतदान प्रक्रिया १९ एप्रिलला होणार आहे. तर दुसरा टप्प्याची मतदान प्रक्रिया २६ एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे, चौथ्या टप्प्यासाठी १३ मे, पाचव्या टप्प्यासाठी २० मे, सहाव्या टप्प्यासाठी २५ मे आणि सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
तर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ४ मे रोजी कोणत्या पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये बाजी मारली याचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले होते की, आमची टीम निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. या निवडणुकीमध्ये ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशामध्ये एकूण १०.५ लाख मतदान केंद्रे असतील. तर मतदान प्रक्रियेमध्ये ५५ लाख ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.