Sushma Andhare: ...तर तुम्ही टेंभी नाक्यावर गेला असता, खरी शिवसेना शिंदेची असं म्हणणाऱ्या PM मोदींना सुषमा अंधारेंचा टोला

Sushma Andhare On Eknath Shinde: गोंदिया येथील सभेदरम्यान पीएम मोदींनी खरी शिवसेना ही शिंदेची आहे आणि तेच खरे शिवसेनाप्रमुख असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवेसना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पीएम मोदींवर टीका केली आहे.
ushma Andhare Criticized PM Narendra Modi
Sushma Andhare On PM Modi Saam Tv
Published On

Sushma Andhare On PM Narendra Modi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी पीएम मोदी आज महाराष्ट्रात आले होते. यावेळी गोंदिया येथील सभेदरम्यान पीएम मोदींनी खरी शिवसेना ही शिंदेची आहे आणि तेच खरे शिवसेनाप्रमुख असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवेसना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पीएम मोदींवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पीएम मोदींना खरी शिवसेना नक्की कोणाची याची आठवण करून दिली आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मोदीजी वंदनीय बाळासाहेब हयात असतानाही आणि त्यानंतर उद्धवसाहेबांनी शिवसेनेची धुरा सांभाळल्यानंतरही मातोश्रीचे उंबरे झीजवायला आपण येथे येत होतात. मातोश्री वरून कधीही कुणी दिल्लीत मुजरे करायला आले नाही.' असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पीएम मोदींवर टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, 'आज गोंदियाच्या प्रचार सभेमध्ये बोलताना मोदीजींनी खरी शिवसेना ही शिंदेंची आहे आणि तेच खरे शिवसेनाप्रमुख आहेत अशी मुक्ताफळ नेहमीप्रमाणे उधळी. परंतु पंतप्रधान महोदयांना जरा याची आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा बाळासाहेब हयात होते तेव्हा जेव्हा कधी तिकीट वाटपांची चर्चा व्हायची तेव्हा अडवाणी, गडकरी, मुंडे मातोश्रीवर यायचे. बाळासाहेब यांच्यानंतरही ही शिवसेना जेव्हापासून पक्षप्रमुख उद्धवसाहेब बघत आहेत तेव्हाही मोदी-शहा सगळी मंडळी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिजवायचे.'

ushma Andhare Criticized PM Narendra Modi
Manoj Jarange-Patil: आधी महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आता..., जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना काय केलं आवाहन?

मोदी-शहा मुंबईत यायचे आणि आम्हाला किती जागा देताय यासाठी अत्यंत याचकासारखे दारात उभे राहायचे आणि आम्ही आमच्या अटी शर्तीवर भाजपसोबत युती करत होतो. परंतु जेव्हापासून आमच्यातली एक गँग फितूरी करून बाहेर पडली आणि त्या फितुरांच्या प्रमुखाला एकदाही हे शक्य झाले नाही की टेंभी नाक्यावर त्यांनी मोदीजी किंवा शहा यांना जागा वाटपासाठी बोलवावे. उलट टेंभी नाक्यावरचा माणूस हा खुर्णी सात आणि मुजरे करत दिल्लीला गेला. हे याचं फार मोठं प्रमाण आहे की पंतप्रधान महोदय की खरी शिवसेना कुणाची आहे? शिवसेना जर शिंदे चालवत असते तर तुम्ही टेंभी नाक्यावर गेला असता जसे आधी तुम्ही मातोश्रीला उंबरे झिजवायला येत होतात.'

ushma Andhare Criticized PM Narendra Modi
Nana Patole: भाजपने इतर पक्षातील लोकांना फोडून आपलं घर सजविण्याचे काम केलं, नाना पटोले यांचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com