Nana Patole: भाजपने इतर पक्षातील लोकांना फोडून आपलं घर सजविण्याचे काम केलं, नाना पटोले यांचा आरोप

Loksabha Election 2024: भंडारा- गोंदिया काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचार सभेसाठी नाना पटोले भंडाऱ्यामध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
Nana Patole On BJP
Nana Patole Bhandara NewsSaam tv

शुभम देशमुख, भंडारा

Nana Patole On BJP:

'भाजप इतर पक्षातील लोकांना फोडून आपलं घर सडविण्याचे काम करत आहे. तसंच भाजप देशभरामध्ये प्रचारासाठी गुंडे आणत आहे.', असा गंभीर आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. भंडारा- गोंदिया काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचार सभेसाठी नाना पटोले भंडाऱ्यामध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपवर निशाणा साधताना नाना पटोले यांनी सांगितले की, 'भाजप किती घाबरलेली आहे तुम्हाला स्पष्ट दिसते आहे. म्हणजे यांना तर एवढी गर्मी होती. यांना असं वाटत होतं की, अमर पन्ना प्राप्त झालेलं आहे आणि आता जे काही पाप करू लोकं आम्हला मान्य करतील. ही भारतातील लोकशाही आहे. लोकशाही किती मजबूत आहे हे त्यांना निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. या पक्षातले लोकं तोडा त्या पक्षातले लोक तोडा कसं तरी आपलं घर सजवण्याचं काम भाजप करत आहे.'

Nana Patole On BJP
Ajit Pawar: १३ तारखेचं मतदान होईपर्यंत विरोधकांना भेटू नका, अजित पवारांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना तंबी

नाना पटोले यांनी पुढे सांगितले की, 'भाजपवाल्यांच्या पाया खालीची वाळू सरकली आहे. देशभरातले त्यांचे गुंडे नेते असतील त्यांना प्रचारासाठी इथे आणण्याचे काम सुरू झाले आहे. आज कितीही कोणते नेते आले तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार नाही. विशेषतः विदर्भामध्ये पहिल्या टप्पातल्या पाचही लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे जागा येतील हे स्पष्ट झालेलं आहे. काही केलं किती स्टेटमेंट केलं तरी यांच्यावर भरोसा कोण करणार. गॅरंटी म्हणजे मोदी सरकारची वापसी आणि काँग्रेस पक्षाने जो जाहिरनामा प्रसिद्ध केला. या देशातल्या गरीब लोकांसाठी महिला सक्षमीकरणासाठी या देशातील बहुजनांना न्याय देण्यासाठी जाहीरनामा काँग्रेसने दिला. ही काँग्रेसची गॅरंटी आहे. या गॅरंटीमुळे भाजप घाबरले आहेत.'

Nana Patole On BJP
Sanjay Dutt: 'मी राजकारणात येईल तेव्हा...', लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर संजय दत्तने सोडलं मौन

तसंच, 'भाजप कुठल्या लेव्हलवर जाऊ शकते. कुणाच्या जीवनामध्ये विष कस कालवायचं हे फडणवीस आणि त्यांचं भाजप पक्षातील त्यांच्या माजी खासदाराला भाजपच्या वरिष्ठ नेत्याला हे सिद्ध झालेल आहे. या पद्धतीच्या बातम्या पेरायच्या जे मूळ प्रश्न आहेत. यात महागाई भ्रष्ट्राचार शेतकऱ्याचे प्रश्न गरिबांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येईल आणि मीडियामध्ये त्याच बातम्या कशा चालवता येईल. गेली पाच वर्षे केलेलं आहे आता सोमय्या खरी वस्तू स्थिती सांगणार नाही.'

Nana Patole On BJP
Vijaykumar Gavit: मोदींनी आणलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात आम्ही कमी पडलो, राज्यातील भाजप मंत्र्याचं वक्तव्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com