Sanjay Dutt: 'मी राजकारणात येईल तेव्हा...', लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर संजय दत्तने सोडलं मौन

Sanjay Dutt On Loksabha Election: गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तची राजकारणातील प्रवेशाबाबतची चर्चा आणि तो हरियाणातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील बोलले जात होते. तो हरियाणातील यमुनानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असे म्हटले जात होते.
Sanjay Dutt On Joining Politics
Sanjay DuttSaam Tv
Published On

Sanjay Dutt On Joining Politics:

बॉलिवूडसह (Bollywood) टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी अभिनयानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. कंगना रनौत (Kangana Ranaut), अरुण गोविल (Arun Gavil) आणि गोविंदा (Govinda) यासारख्या सेलिब्रिटींनी राजकारणात एन्ट्री केली. यामधील काही सेलिब्रिटी 2024 ची लोकसभा निवडणूक देखील लढवणार आहेत. या सगळ्यादरम्यान आता बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तची राजकारणातील प्रवेशाबाबतची चर्चा आणि तो हरियाणातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील बोलले जात होते. तो हरियाणातील यमुनानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असे म्हटले जात होते. अशामध्ये आता या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे खरंच संजय दत्त लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

संजय दत्त काँग्रेस पक्षातून लोकसभा निवडणूक लढवू शकतो अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत अशामध्ये आता संजय दत्तने प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिले आहे. संजय दत्तने मी राजकारणात प्रवेश करत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या सर्व अफवा खोटा असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. संजय दत्तच्या कुटुंबाचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध आहे. त्याचे वडील सुनील दत्त हे उत्कृष्ट अभिनेते आणि राजकारणी होते. सुनील दत्त काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री होते. ते खासदार देखील होते.

तर संजय दत्तची बहीण प्रिया दत्तही अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. त्या काँग्रेसच्या खासदार देखील होत्या. अशामध्ये संजय दत्तही राजकारणात प्रवेश करणार असून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. आता संजय दत्तने राजकारणात येण्याच्या वृत्तावर मौन सोडले आहे. त्याने अशा बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.

संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण राजकारणात जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'मी माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दलच्या सर्व अफवांना पूर्णविराम लावू इच्छितो. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही. तसंच कोणतीही निवडणूक लढवत नाही. जर मी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले, तर मी त्याची घोषणा करणारा पहिला असेन. आत्तापर्यंत माझ्याबद्दलच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.'

Sanjay Dutt On Joining Politics
Dhanush And Aishwarya Divorce: २०२२ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय, २ वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज!, धनुष- ऐश्वर्याबाबत मोठी अपडेट

संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 'वेलकम टू द जंगल', 'डबल आइस्मार्ट', 'बाप', 'शेरा दी कॉम पंजाबी' आणि 'केडी-द डेविल' या चित्रपटामध्ये तो दिसणार आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी भाजमध्ये प्रवेश केला. ती हिमाचल प्रदेशच्या मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तर 'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल भाजप पक्षातून मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तर गोविंदाने काही दिवसांपूर्वी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.

Sanjay Dutt On Joining Politics
Kangana Ranaut Bought New Car: कंगना रनौतने खरेदी केली कोट्यवधींची आलिशान कार, किंमत वाचून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com