Kangana Ranaut Bought New Car: कंगना रनौतने खरेदी केली कोट्यवधींची आलिशान कार, किंमत वाचून बसेल धक्का

Kangana Ranaut Latest News: सध्या लोकसभा निवडणूकीमुळे प्रकाशझोतात आलेल्या कंगनाने मुंबईमध्ये नवी कोरी अलिशान कार खरेदी केलेली आहे. तिच्या नव्या अलिशान कार्सचे व्हिडीओज् सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Kangana Ranaut Bought New Car
Kangana Ranaut Bought New CarSaam Tv

Kangana Ranaut Bought New Car

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार आहे. कंगना रनौतला भाजपकडून (BJP) तिकीट देण्यात आले आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या निवडणूकीमुळे प्रकाशझोतात आलेल्या कंगनाने मुंबईमध्ये नवी कोरी अलिशान कार खरेदी केलेली आहे. तिच्या नव्या अलिशान कार्ससोबतचे काही फोटोज् आणि व्हिडीओज् सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Bollywood)

Kangana Ranaut Bought New Car
Jar Tar Chi Goshta: प्रिया- उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाचा शंभरावा प्रयोग सादर, अभिनेत्रीच्या आवाजतलं गाणंही रिलीज

सध्या विरल भयानी ह्या इन्स्टाग्राम चॅनलवर अभिनेत्रीच्या अलिशान कारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कारच्या शोरूममधून बाहेर पडतानाचा हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. कंगना रनौतचीही मर्सिडीज मेबॅक जीएलएस कार (Mercedes-Maybach GLS) आहे. तिच्याकडे पहिलीही मर्सिडीज कारच आहे. कंगनाकडे पहिली, मर्सिडीज मेबॅक एस ६८० (Mercedes Maybach S680) ही कार होती. मीडिया रिपोर्टनुसार, कंगनाने खरेदी केलेल्या नवीन कारची किंमत २.४३ कोटी रुपये इतकी आहे. (Bollywood News)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, कंगनाने पांढऱ्या रंगाची कार खरेदी केलेली आहे. कंगना तिच्या कारमधून बाहेर येताच पापाराझींनी तिच्याकडे कॅमेरे फिरवले. यावेळी कंगनाने सर्व पापाराझींना हात देखील दाखवला. कंगनाने यावेळी पांढऱ्या रंगाचा ड्रेस, ब्लॅक गॉगल कॅरी करताना दिसली. कंगनाचा नव्या कारचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Social Media)

Kangana Ranaut Bought New Car
Game Changer Release Date: राम चरण- कियाराचा बिगबजेट 'गेम चेंजर' कधी प्रदर्शित होणार?; समोर आली महत्वाची अपडेट

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' हा पीरियड ड्रामा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असून कंगना स्वत: या चित्रपटाचं दिग्दर्शन ती करत आहे. या व्यतिरिक्त कंगना पॅन इंडिया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे, त्या चित्रपटामध्ये कंगना आर माधवनसोबत दिसणार आहे. (Entertainment News)

Kangana Ranaut Bought New Car
अल्लू अर्जूनकडून वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट, Pushpa 2 The Rule चा ॲक्शनबाज टीझर प्रदर्शित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com