Dhanush And Aishwarya Divorce
Dhanush And Aishwarya DivorceSaam Tv

Dhanush And Aishwarya Divorce: २०२२ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय, २ वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज!, धनुष- ऐश्वर्याबाबत मोठी अपडेट

Dhanush And Aishwarya: दिग्दर्शक ऐश्वर्या रजनीकांत आणि प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक धनुष यांनी अखेर घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

Dhanush And Aishwarya Divorce

Siddhesh Sawant

दिग्दर्शक ऐश्वर्या रजनीकांत आणि प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक धनुष यांनी अखेर घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नुकताच त्यांनी चेन्नईच्या कौटुंबीक न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केल्याची माहिती माहिती समोर आलीय. दोघांच्या संमतीने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिलीय.

दोन वर्षांपूर्वी धनुषने सोशल मीडियामध्ये पोस्ट करत आपल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. जानेवारी २०२२मध्ये धनुषने ऐश्वर्यासोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जगजाहीर केलं होतं. त्यावेळी त्यानं लिहिलेली पोस्टही चांगलीच गाजली होती.

धनुष आणि ऐश्वर्या यांचं २००४ साली लग्न झालं होतं. आता कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेतल्यानंतर लवकरच कोर्टात त्यांची याचिका सुनावणीसाठी घेतली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्या आणि धनुष हे वेगवेगळे राहतात. पण गेल्याच वर्षी ते दोघंही त्यांचा मुलांच्या शाळेच्या एका कार्यक्रमात एकत्र दिसून आले होतं. त्यानंतरही त्यांच्या बाबतच्या चर्चांना सिनेविश्वात उधाण आलं होतं.

दोन वर्षांपासून धनुषने सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या नात्याबद्दलची भावनिक बाजू मांडली होती. त्यात त्याने आपल्या नातं आता एका अशा टप्प्यावर आलं, जिथे आपला जोडीदार आणि आपला मार्ग वेगवेगळा असल्याचं त्यानं नमूद केलं होतं. १८ वर्षांच्या एकत्र प्रवासात आम्ही मैत्री, पालकत्व आणि एकमेकांचे सोबती म्हणून राहिलो. हा प्रवास समजुतीचा, मोठा करणारा, शिकवणारा असा होता, असंही त्याने म्हटलं होतं. पण आता वेगळं होऊन आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचं ठरवलंय, असंही त्याने यात नमूद केलं होतं. आपण घेतलेल्या या निर्णयाचा तुम्ही सगळ्यांनी आदर करावा, अशी विनंतीही करायला धनुष विसरला नव्हता.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com