Ajit Pawar: १३ तारखेचं मतदान होईपर्यंत विरोधकांना भेटू नका, अजित पवारांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना तंबी

Maval Loksabha Election 2024: मावळमधील मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. निवडणुका होईपर्यंत विरोधी पक्षातील उमेदवारांना न भेटण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला. दुसऱ्या पक्षातील मित्रांना भेटल्यामुळे गैरसमज होऊ शकतात असे त्यांनी यावेळी सांगितले.
Maval Loksabha Election 2024
Ajit Pawar Saam Tv

Ajit Pawar On Opposition Leaders:

महायुतीचे मावळ लोकसभा (Maval Loksabha Election) क्षेत्राचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे (Shrirang Barane) यांच्या निवडणूक प्रचारासाठी आज पिंपरी- चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरात महायुती पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेचे नेते तसेच उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना 13 मे पर्यंत विरोधकांना भेटू नका, अशी तंबी दिली आहे.

मावळमधील मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. निवडणुका होईपर्यंत विरोधी पक्षातील उमेदवारांना न भेटण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला. दुसऱ्या पक्षातील मित्रांना भेटल्यामुळे गैरसमज होऊ शकतात असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यकर्त्यांनी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'आज विरोधी पक्षातील उमेदवाराचे आपल्या शहरात आणि पक्षात बरेचं नाते संबंध आहेत. त्यामुळें निवडणुकीत गैरसमज होऊ नये म्हणून विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. माझी महायुतीच्या कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे की १३ तारखेचं मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका. दादा सहज गेलो होतो, दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. गप्पा नको, टप्पा नको. मी तसलं काही ऐकून घेणार नाही.'

Maval Loksabha Election 2024
Lok Sabha Election: मोदी पुन्हा सत्तेत आले तर सर्व विरोधी पक्षनेते तुरुंगात असती, हीच त्यांची गॅरंटी: ममता बॅनर्जी

'काही गोष्टी निवडणुकीची प्रचार यंत्राणा एकदा सुरू झाल्यानंतर पाळावीच लागते. आपली महायुती आहे. महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नातंसंबंध थोडे बाजूला ठेवा. ही भावकिची किंवा गावची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाची आहे.', अशी तंबी अजित पवारांनी यावेळी कार्यक्रत्यांना दिली. तसंच, ' विरोधी पक्षातील उमेदवार कदाचित असं सांगेल की अजितदादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे. धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका.', असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

Maval Loksabha Election 2024
Sanjay Nirupam On Sanjay Raut: संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, 'बेरजेचे राजकारण सोडून विकासचं राजकारण करण्यासाठीं आम्हीं सर्वजण एकत्र आलो आहोत. आज मोदीच्या हातात आपला देश सुरक्षित वाटतो. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन आपल्या देशाची अर्थव्यस्था आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे. आज विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदासाठी सक्षम उमेदवार नाही. विरोधकांनी अशी आश्वासन दिली की जी कधीच पूर्ण होऊ शकत नाही. देशाची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. जोपर्यंत सुरी आणि चंद्र आहे तोपर्यंत तरी आपली राज्यघटना कुणी बदलू शकत नाही.'

Maval Loksabha Election 2024
Shrirang Barne On Parth Pawar: पार्थ पवारांनी माझ्या प्रचाराला यावं, श्रीरंग बारणे यांचे अजित पवार यांच्यासमोर आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com