Dog Attack Video: भटक्या कुत्र्याचा १५ वर्षीय मुलावर हल्ला; थरारक VIDEO व्हायरल

Stray Dog Attack Video Viral: गाझियाबादमध्ये एका भटक्या कुत्र्याने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dog Attack Video
Dog Attack VideoSaam Tv

Stray Dog Attack On Minor Boy

दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालला आहे. गाझियाबादमध्ये एका भटक्या कुत्र्याने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला (Dog Attack Video) केल्याची घटना घडली आहे. चवताळलेल्या कुत्र्याने या मुलावर हल्ला केला. त्याचे लचके तोडायला सुरूवात केली. शेजारी उभे असलेले लोक प्रेक्षक बनून ही घटना बघत होते. पण कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. (latest accident news)

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्र्याने मुलावर हल्ला केल्यावर तिथे असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली (Dog Attack Video Viral) होते. व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्र्याने मुलावर कसा हल्ला केला आणि त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. आजुबाजूचे लोक त्याला मदत करण्याऐवजी शो पाहत होते. त्यानंतर आणखी 2-3 कुत्रे तिथे आल्यावर तेही (Stray Dog Attack) घरात जाऊन लपले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही वेळातच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. गाझियाबादमध्ये ही हृदयद्रावक घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचा (Stray Dog Attack On Minor Boy) हा थरारक व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या आयडीसह X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 44 सेकंदांचा आहे. तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Dog Attack Video
Viral Video: मोये मोये झालं! ऑफिसमध्ये थाप मारुन IPL बघायला गेली, बॉसने टीव्हीवर पाहिलं अन्.. VIDEO

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल (viral) होत असतात. सध्या भटक्या https://saamtv.esakal.com/topic/dogशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक केवळ हैराणच नाहीत तर संतापले आहेत. कुत्रा हा अत्यंत निष्ठावान प्राणी मानला (viral video) जातो. परंतु, भटक्या कुत्र्यांबाबत आपण असं विधान करू शकत नाही.भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेच्या अनेक घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. असाच हा एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत (viral news) आहे.

Dog Attack Video
Viral Video: बापरे! बॉसच्या त्रासाला कंटाळले, थेट गुंडाना सुपारी देऊन भररस्त्यात धु धु धुतलं; धक्कादायक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com