सध्या क्रिडा विश्वात आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. आयपीएल पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी मैदानात गर्दी करताना दिसत आहेत. अनेकजण तिकीट मिळवण्यासाठी, आपल्या लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी ऑफिसला सुट्टी टाकून, हजारो रुपये खर्च करुन मैदानामध्ये पोहोचत आहेत. अशातच एका आरसीबीच्या चाहतीला ऑफिसमध्ये बॉसशी खोटे बोलून सुट्टी टाकणे चांगलेच महागात पडल्याची बातमी समोर आली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) थरार सुरू झाल्यापासून क्रिकेटप्रेमी मैदानावर गर्दी करताना दिसत आहेत. अनेकजण घरी खोटे बोलून, ऑफिसमध्ये सुट्या टाकून मॅच पाहण्यासाठी येत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मोठी चाहती नेहा द्विवेदी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. मॅच पाहण्यासाठी तिने ऑफिसमध्ये बॉसशी घरगुती अडचण असल्याचेही सांगितले होते. मात्र टीव्हीवर मॅच पाहताना तरुणीच्या बॉसने तिला पाहिलं अन् चोरी पकडली गेली. याबाबत या महिलेने पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये ती म्हणते की, ती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. हा सामना थेट टीव्हीवर दाखवला जात होता आणि त्यादरम्यान तिला बॉसने टीव्हीवर पाहिले. बॉसने बेंगळुरू संघ खरोखर आवडतो का असे विचारले. महिलेने हो असे उत्तर दिले. तसेच काल ऑफिसमधून लवकर जाण्याचे हेच कारण होते का? असेही तिचे बॉस तिला म्हणाले.
या व्हिडिओला (Viral Video) नेहाने ‘मोये-मोये दिवसेंदिवस खरं समोर येत आहे, असा कॅप्शनही दिला आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला मोये- मोये झालं म्हणून खिल्ली उडवली आहे. तर काही जणांनी नशीब बॉसने काढून टाकलं नाही? अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.