Dinesh Karthik IPL 2024 : शिव्या दिल्या जातात, कुटुंबातील सदस्यांनाही सोडत नाही; दिनेश कार्तिकने सांगितली मनातील सल

Dinesh Karthik talks with ravichandran ashwin : 'सामन्यात तुमची कामगिरी चांगली झाली नाही, तर चाहते तुम्हाला शिव्या द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. असे चाहते ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला होता, अशा शब्दात दिनेश कार्तिकने अश्विनला मनातील सल सांगितली.
Dinesh Karthik
Dinesh Karthik Saam Tv

Dinesh Karthik Latest News:

टीम इंडिया खेळाडू दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा मोठा चाहता वर्ग आहे. याची दुसरी बाजू देखील आहे. हीच बाजू कार्तिकने रविचंद्रन अश्विनसोबत बोलताना सांगितली. 'सामन्यात तुमची कामगिरी चांगली झाली नाही, तर चाहते तुम्हाला शिव्या द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. असे चाहते ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला होता, अशा शब्दात दिनेश कार्तिकने अश्विनला मनातील सल सांगितली.

कार्तिकने अश्विनला काय म्हटलं?

मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिकने अश्विनला म्हटलं की, 'आरसीबीचे चाहते प्रामाणिक आहेत. ते एका परिवारासारखे आहेत. ही बाब चांगली आणि वाईट देखील आहे. चांगली बाब म्हणजे, तुम्ही मैदानात खेळायला उतरतात, तेव्हा चाहते तुमच्या नावाचा जयजयकार करतात. तेव्हा तुम्हाला वाटेल की, तुम्ही पृथ्वीवरील महान खेळाडू आहात. माझ्या बोलण्याचा अर्थ असा नाही की, ते बाहेर जगात तुमची साथ सोडणार नाही. तुमचा आणि विरोधी पक्षातील खेळाडूसोबत वाद झाले, तर चाहते तुटून पडतील'.

Dinesh Karthik
T20 World Cup 2024: अभिषेक -पराग ते दुबे अन् मयांक! IPL कामगिरीच्या आधारे निवड झाल्यास T-20 WC साठी अशी असेल टीम इंडिया

खेळाडूसोबत त्याच्या कुटुंबालाही दिली जातात दुषणे

कार्तिकने पुढे म्हटलं की, 'चाहते शिव्या द्यायला मागे पुढे पाहत नाही. ते कुटुंबातील सदस्यांनाही शिव्या देतात'. 'कार्तिकने पुढे म्हटलं की, 'वैयक्तिक पातळीवर तुम्हाला सोशल मीडियावर मेसेज करत शिवीगाळ केली जाते. माझं सामन्यात चांगलं प्रदर्शन नसेल तर माझ्यावर टीकेचा भडीमार होतो. ते फक्त मलाच नव्हे, तर माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही शिव्या घालतात'. (IPL)

Dinesh Karthik
IPL 2024: केकेआरचा विजय रथ रोखला! चेन्नईच्या शानदार विजयानं Points Table मध्ये हैदराबादची गच्छंती

दरम्यान, २००८ मध्ये आयपीएल सुरु झाल्यानंतर दिनेश कार्तिक हा आरसीबी व्यतिरिक्त दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइटरायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, गुजरात लायन्स या संघाकडून क्रिकेट खेळला आहे. 'आरसीबी जवळ मोठा चाहता वर्ग आहे. आरसीबीचा संघ गेल्या १६ वर्षांपासून आयपीएलमध्ये आहे. मी आयपीएलमध्ये अनेक संघाकडून खेळलो आहे, असंही कार्तिकने सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com