Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

Singham Again Shooting Scene Viral : सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये, अजय देवगण- जॅकी श्रॉफ यांचा एक फाईट सीन लीक झालाय.
Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...
Singham Again Shooting Scene ViralSaam Tv

सध्या चाहत्यांमध्ये, 'सिंघम अगेन'ची जोरदार चर्चा सुरू आहे. या धडाकेबाज ॲक्शन चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे. 'सिंघम ३' मध्ये बॉलिवूडमधील प्रमुख कलाकार दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चित्रपटातील दिपीका पदुकोणचा लूक व्हायरल झाला होता. अशातच, सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये, अजय देवगण- जॅकी श्रॉफ यांचा एक फाईट सीन लीक झालाय.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...
Pankaj Jha Accused Actor Pankaj Tripathi : 'स्ट्रगलचा ढोल बडवणारे...', 'पंचायत'मधील आमदाराचा पंकज त्रिपाठींवर निशाणा

सध्या 'सिंघम अगेन'ची शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. या धडाकेबाज ॲक्शन चित्रपटाची शूटिंग श्रीनगरमध्ये सुरू आहे. दरम्यान, नुकताच चित्रपटाच्या सेटवरून लीक झालेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे रोहित शेट्टीच्या चित्रपटातला मोठा सस्पेन्स समोर आला आहे. चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे आतापर्यंत केवळ जाहीर करण्यात आले होते. मात्र या व्हिडीओनंतर 'सिंघम अगेन'मध्ये एक नाही तर दोन खलनायक दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरा खलनायक अभिनेते जॅकी श्रॉफ असणार आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्यात फायटिंग सीनचं शूटिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अजय पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे. तर जॅकी श्रॉफ हे ग्रीन जॅकेट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या व्हायरल झालेल्या फायटिंग सीनच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चित्रपटातल्या जॅकी श्रॉफच्या भूमिकेबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. चित्रपट २०२४ मध्येच रिलीज होण्याची शक्यता आहे.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...
Devdatta Nage : 'तुझी प्रकर्षाने आठवण येत आहे रे...'; 'जय मल्हार' मालिकेतील अभिनेत्याची सह कलाकारासाठी भावनिक पोस्ट

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजयशिवाय अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहे. अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या सीनचे शूटिंग पूर्ण केले आहे. तर दीपिकाच्या सीन्सची शुटिंग संपलेली आहे.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...
Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com