Devdatta Nage : 'तुझी प्रकर्षाने आठवण येत आहे रे...'; 'जय मल्हार' मालिकेतील अभिनेत्याची सह कलाकारासाठी भावनिक पोस्ट

Devdatta Nage Shared Emotional Post : झी मराठीवरील 'जय मल्हार' मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे. आज या मालिकेला टेलिकास्ट होऊन १० वर्षे झाले आहेत.
Devdatta Nage Post
Devdatta Nage PostSaam Tv
Published On

झी मराठीवरील 'जय मल्हार' मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे. आज या मालिकेला टेलिकास्ट होऊन १० वर्षे झाले आहेत. मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे होता. मालिकेमध्ये त्याने खंडोबारायाची भूमिका साकारली होती. नुकतंच अभिनेत्याने मालिकेबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अभिनेते अतुल अभ्यंकर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Devdatta Nage Post
Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

इन्स्टा स्टोरीवर देवदत्त नागे याने एका सीनचा फोटो शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या फोटोवर त्याने कॅप्शन दिले की, "प्रति... अतुल अभ्यंकर, अतुल... आज 18 मे 2024! 18 मे 2014, 7 वाजता Zee मराठी वर आपल्या “जय मल्हार” चा पहिला Episode प्रक्षेपित झाला आणि श्री खंडेराया चरणी आपली सेवा रुजू झाली! आज तुझी प्रकर्षाने आठवण येत आहे रे... 'देवयानी' मालिकेमध्ये आपली ओळख आणि लगेच 'ऋणानुबंध' तुझी अचानक एक्झिट अतिशय दुःखदायी होती! पण तरीही आपल्या सेटवर, आपल्या Make Up Room मध्ये तुझं अस्तित्व सतत जाणवत होतं !"

Devdatta Nage : 'तुझी प्रकर्षाने आठवण येत आहे रे...'; 'जय मल्हार' मालिकेतील अभिनेत्याची सह कलाकारासाठी भावनिक पोस्ट
Devdatta Nage Shared Emotional PostInstagram

पुढे पोस्टमध्ये, देवदत्त नागेने लिहिले की, "अजूनही श्री क्षेत्र जेजुरीला, जेव्हा श्री हेगडी प्रधान ह्यांचे दर्शन घेतो तेव्हा... तुझाच चेहरा समोर असतो रे, अरे आज तू असतास तर आपल्या "जय मल्हार" मालिकेच्या दशकपूर्तीला सोन्याची झालर असती! अतुल... जय मल्हारची ही दशकपुर्ती तुला समर्पित आहे, जय मल्हार!" अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे नोव्हेंबर २०१४ मध्ये निधन झाले. त्यांनी मालिकेमध्ये, प्रधानची भूमिका साकारली. मालिकेत मुख्य भूमिकेत, देवदत्त नागेसह सुरभी हांडे आणि ईशा केसकर होते. यांसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारही होते.

Devdatta Nage Post
Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com