Tejasswi- Karan Airport Video : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट, VIDEO VIRAL

Tejasswi Prakash And Karan Kundra Airport Video : 'बिग बॉस १५' मधील फेमस कपल तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या गेल्या काही दिवसांपासून ब्रेकअपच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. अशातच हे कपल एकत्र स्पॉट झाले आहे.
Tejasswi- Karan Airport Video : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट, VIDEO VIRAL
Tejasswi Prakash And Karan Kundra Airport VideoSaam Tv

'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) मधील फेमस कपल तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कपलच्या ब्रेकअपची चर्चा सुरू आहे. नुकतंच हे कपल सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी परदेशात गेले होते. वॅकेशन एन्जॉय करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. अशातच आता हे कपल मुंबईत परतले आहे. मुंबईत आल्यानंतर हे दोघेही एकत्र कॅमेऱ्यामध्ये एकत्र स्पॉट झालेले आहेत.

Tejasswi- Karan Airport Video : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट, VIDEO VIRAL
Auron Mein Kahan Dum Tha : 'कल्की 2898 एडी' च्या यशामुळं नीरज पांडेला लागला दम; थेट रिलीज डेटच बदलली

विरल भयानी या पापाराझी इन्स्टा चॅनलने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. परदेशातून सुट्टीचा आनंद लुटून परतत असताना ते दोघेही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. दोघेही खूपच आनंदीत होते. यावेळी तेजस्वीने लाईट ब्लू मिडी वेअर केली आहे. तर करणने क्रीम कलरची हुडी आणि जीन्स कॅरी केलेली दिसत आहे. तेजस्वी प्रकाश एयरपोर्टवर ओपन हेअर्स आणि नो मेकअप लूकमध्ये दिसली होती. पण तरीही ती खूपच सुंदर दिसत होती. तेजस्वी लाईट ब्लू ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती. सध्या सोशल मीडियावर करण आणि तेजस्वीचा लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

'बिग बॉस १५'मध्ये (Bigg Boss 15) तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी शोमध्ये तेजस्वी आणि करणची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बिग बॉसनंतर तेजस्वी एकता कपूरच्या'नागिन ६' मालिकेत दिसली होती, या मालिकेनेही तिला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. तर करण सध्या टीव्हीवरील काही कार्यक्रमात होस्टिंग करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वीचा कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.

Tejasswi- Karan Airport Video : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट, VIDEO VIRAL
Hina Khan Hospitalized : हिना खानवर उपचार सुरू, पहिली कीमोथेरेपी घेताना VIDEO केला शेअर; चाहते झाले इमोशनल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com