Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिवसेनेत करणार प्रवेश

Pune Politics Congress Leader Rohit Tilak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या टिळक पुरस्कारावरून वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार आहेत.
Big blow to Congress in Pune; Congress leader Rohit Tilak is likely to quit the party and join Shiv Sena soon.
Big blow to Congress in Pune; Congress leader Rohit Tilak is likely to quit the party and join Shiv Sena soon.saam tv
Published On
Summary
  • पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; रोहित टिळक यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

  • लवकरच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता.

  • टिळक पुरस्कार वादानंतर काँग्रेसमध्ये नाराजी वाढली होती.

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. लवकरच ते शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिल्यामुळं काँग्रेसमध्ये रोहित टिळक यांच्याबाबत नाराजी होती. अखेर काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.

Big blow to Congress in Pune; Congress leader Rohit Tilak is likely to quit the party and join Shiv Sena soon.
AhilyaNagar News: आई-बहिणीवरून शिवी द्याल तर बसेल दंड; कोळगावच्या निर्णयाची राज्यभरात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक स्मारक ट्रस्ट यांच्यातर्फे टिळक पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळं काँग्रेसमध्ये रोहित टिळक आणि टिळक कुटुंबीय यांच्या विरोधात कुरबुर सुरू झाली होती. याविरोधातील वातावरणामुळे आणि स्वतः विरुद्धच्या तक्रारींना त्रासून काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Big blow to Congress in Pune; Congress leader Rohit Tilak is likely to quit the party and join Shiv Sena soon.
ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

हाती आलेल्या माहितीनुसार, रोहित टिळक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे आहेत म्हणून नाही तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांचं व्हिजन चांगलं आहे. त्यामुळं त्यांना पुरस्कार दिला होता. मात्र त्यानंतर काँग्रेसने कायम नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचा हे नॅरो माईंड कधीपर्यंत सोसायचं, असं म्हणत रोहित टिळकांनी काँग्रेस पक्षाशी काडीमोड केलाय.

2009 आणि 2014 सालची कसबा विधानसभा लढली होती

लोकमान्य यांच्या काळात काँग्रेस ही एक मोठी चळवळ होती. स्वातंत्र्य पूर्व काळापासून टिळक घराणं काँग्रेससोबत होतं. लोकमान्य टिळक हे मूळचे काँग्रेसी होते. जयंतराव टिळक हे काँग्रेसचे खासदारही राहिलेत. रोहित टिळक यांनी 2009 आणि 2014 सालची कसबा विधानसभा काँग्रेसमधूनच लढली. रोहित टिळक हे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसही राहिले. दरम्यान जेव्हा पंतप्रधान मोदींना मानाचा टिळक पुरस्कार दिला गेला. तेव्हापासून काँग्रेस हायकमांड आणि टिळक फँमिलीचा दुरावा वाढत गेला.

शिवसेनेकडून आपल्याला राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा झाली म्हणूनच मी त्यादिवशी मुंबईला फॉर्म भरायलाही गेलो होतो. पण मविआकडून शरद पवार यांचे नाव पुढ आल्यानं सगळंच थांबलं. पण तरिही भविष्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेजी जी जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेल, अशी घोषणा रोहित टिळक यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com