Satish Kaushik Why Calling Bollywood Calendar Saam TV
मनोरंजन बातम्या

Satish Kaushik Birth Anniversary: सतीश कौशिक यांना ‘बॉलिवूडचा कॅलेंडर’ का म्हणायचे?, जाणून घ्या किस्सा

Chetan Bodke

Why Should Satish Kaushik Be Known As The Calendar Of Bollywood

असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या आठवणीने आणि त्यांच्या कामांमुळे ते आपल्या चाहत्यांच्या आठवणींत असतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक होय. सतीश कौशिक यांचे गेल्या वर्षी, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज सतीश कौशिक यांची जयंती आहे. आज त्यांची ६६ वी जयंती आहे.

अभिनेते सतीश कौशिक चाहत्यांमध्ये, एक दिग्गज कलाकार, विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे निधन होऊन एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण त्यांच्या स्मृती आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. १३ एप्रिल १९५६ रोजी त्यांचा जन्म हरियाणातील महेंद्रगड येथे झाला होता. अभिनेते, दिग्दर्शक असूनही सतीश कौशीक हे अतिशय डाउन टू अर्थ व्यक्ती होते. लोकांमध्ये बसणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांचे किस्से, समस्या ऐकणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांना आवडायचे. त्यांचा स्वभाव कायमच चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही फारच भावतो.

सतीश कौशिश यांना ‘बॉलिवूडचा कॅलेंडर’ म्हणून कायमच म्हटले जाते. ‘मिस्टर इंडिया’तील रोलवरून त्यांना हे नाव पडले होते. या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटातील नोकर असलेल्या कॅलेंडरचे पात्राने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली आहे.

त्यांनी स्वतःनेच चित्रपटातल्या सर्व स्टारकास्टची ऑडिशन घेतली होती. पण त्यांना कॅलेंडर पात्राला सूट होईल, असा कोणताही कलाकार मिळाला नाही. त्यांनी त्या पात्रासाठी अनेकांची ऑडिशन घेतली होती.

चित्रपटामध्ये असलेल्या कॅलेंडर पात्राचे संवाद आणि विनोदी स्वभाव पाहून त्या व्यक्तिरेखेसाठी अनेक लोक नाकारले होते. शेवटी त्या पात्रासाठी सतीश कौशिक यांनीच ऑडिशन दिली आणि ते साकारले. या पात्राने त्यांना विशेष ओळख दिली.

कॅलेंडर ह्या पात्राची चित्रपटामध्ये फार लहान भूमिका होती. सतीश कौशिक यांनी या पात्राला कॅलेंडर असे नाव देण्यामागे खास कारण होते. सतीश यांच्या वडिलांचा एक मित्र त्यांना कायमच भेटायला घरी यायचा. त्यावेळी, ते प्रत्येक गोष्ट कॅलेंडरसोबत जोडून सांगायचे. म्हणजेच, त्यांच्या प्रत्येक किस्स्याची, गोष्टी सुरूवात कॅलेंडरने व्हायची. याच व्यक्तिरेखेपासून प्रेरित होऊन चित्रपटातील सतीश कौशिक यांचे संवादही सारखेच आहेत. ते प्रत्येक संवादाच्या सुरुवातीला त्यांचे कॅलेंडर हे नाव घेत असत. (Bollywood News)

२०२३ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर सतीश कौशिक यांचे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित झाल्या. आणि अजूनही काही प्रदर्शित होत आहेत. किसी का भाई किसी की जान, मिर्ग, कागज २, पटना शुक्ला, द कॉमेडियन, पॉप कौन? आणि गन्स अँड रोझेस वेबसीरीज त्यांच्या इतक्या कलाकृती त्यांच्या निधनानंतर रिलीज झालेल्या आहेत. लवकरच सतीश कौशिक प्रमुख भूमिकेत असलेले कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाचे कथानक आणीबाणीच्या काळातील आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT