Shocking : सासूने सुनेला बॉयफ्रेंडसोबत बेडवर नको त्या अवस्थेत पाहिलं; नंतर भयंकर घडलं

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध संबंध उघड होऊ नयेत म्हणून हा खून केल्याचा आरोप असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime News Saam Tv
Published On
Summary
  • मथुरा जिल्ह्यात धक्कादायक हत्या प्रकरण उघड

  • सुनेने प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली

  • अवैध संबंध उघड होऊ नयेत म्हणून हत्या

  • हत्येनंतर हृदयविकाराचा बनाव करण्याचा प्रयत्न

  • पोलिसांनी आरोपी महिला आणि प्रियकराला अटक केली

Uttar Pradesh Mathura Murder News उत्तर प्रदेशातील मथुरा पोलीस स्टेशन परिसरातील भांकरपूर बसेला गावात एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या सासूची हत्या केली. धक्कादायक म्हणजे सासूने सुनेला तिच्या प्रियकरासोबत एका रुमध्ये विचित्र अवस्थेत पाहिलं होतं. सासूने घडलेला प्रकार कोणाला सांगू नये म्हणून संबंधित महिलेने आणि तिच्या प्रियकराने मिळून तिची हत्या केली. एव्हढ्यावरच न थांबता आरोपी सुनेने आणि तिच्या प्रियकराने हत्येनंतर अपघाताचा बनाव रचला. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. सुनेचे शेजारच्या आदिल नावाच्या तरुणाशी अवैध संबंध होते. ३ मार्चच्या रात्री आदिल तिला भेटण्यासाठी घरी आला. त्यानंतर संबंधित महिला आणि आदिल रूममध्ये बेडवर विचित्र अवस्थेत होते. याच वेळेस महिलेची सासू जागी झाली. सुनेच्या रूममध्ये जाताच तिला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले.

Uttar Pradesh Crime News
Shocking : तरुणाची सटकली, पत्नीसह सासू सासऱ्यांना जिवंत जाळलं; हादरवणारं कारण समोर

सासूला बघून सुनेसह तिच्या बॉयफ्रेंडची त्रेधा तिरपीट उडाली. सासूने कोणाला सांगू नये म्हणून संबंधित महिलेने आणि तिच्या बॉयफ्रेंडने सासूचा गळा आणि तोंड उशीने दाबून तिची हत्या केली. त्यानंतर महिलेने तिच्या नवऱ्याला फोन करून तिच्या आईला मूक हृदयविकाराचा झटका आल्याच सांगितलं.

Uttar Pradesh Crime News
Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

मात्र आरोपी महिलेच्या नवऱ्याला संशय आल्याने त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या अहवालात मृत महिलेच्या मानेचे हाड मोडल्याने आणि श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खोल तपास केल्यावर धक्कादायक बाब निदर्शनास आली. मृत महिलेच्या सुनेने आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com