बेंगळुरूमध्ये दुचाकीच्या वादातून गंभीर हल्ला
आरोपीने पत्नी आणि सासू-सासऱ्यांवर पेट्रोल टाकून जाळले
तिघेही गंभीर भाजले असून रुग्णालयात उपचार सुरू
आरोपीला अटक
कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एका तरुणाने त्याच्या बायकोला आणि सासू साऱ्यांना पेट्रोल टाकून जाळल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे दुचाकी न दिल्याच्या रागातून तरुणाने हे कृत्य केले असल्याचे उघडकीस आले आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव पांडुरंगा (वर्ष ३२) असे आहे. रविवारी पांडुरंगा याने त्याच्या पत्नीच्या माहेरी जाऊन तिची दुचाकी मागितली. मात्र पत्नीने देण्यास नकार दिला. आरोपीच्या पत्नीने नकार दिला म्हणून दोघांमध्ये वाद झाला. या वादात पांडुरंगाच्या सासू सासऱ्यांनी उडी घेत दुचाकी मिळणार नाही असे ठणकावून सांगितले. तसेच घरातून निघून जाण्यास सांगितले.
संतापलेल्या आरोपीने थेट रॉकेल सासू, सासरे आणि पत्नीवर ओतलं. इतक्यावरच न थांबता त्याने तिघांनाही आग लावून पेटवलं. काही क्षणात पांडुरंगाच्या सासरच्या घरी आगीचा भडका उडाला. या भडक्यात त्याची पत्नी आणि सासू, सासरे गंभीर भाजले.
शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना आगीच्या भक्षस्थानातून बाहेर काढल आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तिघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील पोलीस तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.