KKBKKJ Box Office Collection: सलमान खानच्या चित्रपटाला ग्रहण; किसी का भाई किसीस का जान करणार १०० कोटी पार?

KKBKKJ Box Office Collection: सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानच्या कलेक्शनमध्ये सुमारे 30% घट झाली आहे.
KKBKKJ 6th Day Box Office
KKBKKJ 6th Day Box OfficeTwitter

Salman Khan Movie KKBKKJ 6th Box Office Collection: सलमान खान, पूजा हेगडे स्टारर किसी का भाई किसी की जान चित्रपट ईद दिवशी प्रदर्शित झाला. भाईजानच्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी किसी का भाई किसी की जानच्या कमाईत कमालीची घट झाली आहे. दिग्गज आणि नवोदित कलाकारांनी सजलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा सगळ्यांना होती. सलमानची जादू काहीही कमी पडली.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, सहाव्या दिवशी सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानच्या कलेक्शनमध्ये सुमारे 30% घट झाली आहे. सलमान खान स्टारर चित्रपटाने बुधवारी केवळ 4 ते 4.50 कोटींची कमाई करू शकला आहे.

KKBKKJ 6th Day Box Office
Irrfan Khan Movie: माहित नसलेल्या गोष्टी उलगडणार... निधनानंतर ३ वर्षांनी येणार इरफानचा शेवटचा चित्रपट

कोरोनानंतर साऊथ चित्रपटांचे तुफान कलेक्शन होत आहे, तर बॉलिवूडच्या ब्रह्मास्त्र आणि पठान या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली आहे. शाहरुखनंतर सलमान खानच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण 6 दिवसांतही हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार करू शकला नाही.

सलमान खानचा हा चित्रपट गेल्या शुक्रवारी ईदच्या आदल्या दिवशी प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या आकड्यांमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ते अपेक्षेपेक्षा खूप कमी होते. मात्र या चित्रपटाची विंडो कलेक्शन दमदार असेल असे तज्ज्ञांचे मत होते. चित्रपटाचे ओपनिंगही कमी झाले.

चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 13.75 कोटींची कलेक्शन केली. 6 दिवसात चित्रपटाची कमाई 82 कोटींवर आली असून पहिल्या आठवड्यात चित्रपट 85 ते 86 कोटींची कमाई करू शकेल असे बोलले जात आहे. हे स्पष्ट आहे की हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात 100 कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकणार नाही. (Latest Entertainment News)

ईदनंतरही या चित्रपटाने महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली असली तरी इतर राज्यात चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तग धरून राहण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. चित्रपटाचे वर्ल्ड वाइड कलेक्शन त्याच्या एकूण बजेटपेक्षा जास्त झालेले नाही.

चित्रपटाचे बजेट जवळपास 150 कोटी रुपये आहे आणि पाच दिवसात चित्रपटाने जगभरात 133 कोटींची कमाई केली आहे. सलमान खानच्या फॅन फॉलोइंगमुळे चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा अजूनही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com