Irrfan Khan Last Movie Will Released: अभिनेता इरफान खानची तिसरी पुण्यतिथी आहे. इरफानच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला, त्याच्या शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' भारतात प्रदर्शित होत आहे. जवळजवळ सहा वर्षांपूर्वी बनलेल्या या चित्रपटाने जगातील सर्व चित्रपट महोत्सवांमध्ये वाहवा मिळविली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप सिंग यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इरफान खानच्या काही सुंदर आठवणी शेअर केल्या आहेत.
'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' हा चित्रपट २०१९ मध्ये युरोपमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा योग आता येतोय. हा चित्रपट इरफानच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी प्रदर्शित होत आहे आणि मला चित्रपटाचा नायक इरफानची खूप आठवण येत आहे. त्याने माझ्या 'किस्सा' या चित्रपटातही काम केले आहे.
मला आठवतंय की मी 'किस्सा'च्या शॉटची तयारी करत होतो आणि इरफान खान मेकअप रूममध्ये होता. शॉटच्या वेळी मला लय मिळावी यासाठी मी थोडा गुणगुणत होतो. तेवढ्यात माझी तीच धून अजून कोणीतरी गुणगुणू लागलं.
मी मागे वळून पाहिलं तर इरफान गात होता. आम्ही नुसरत फतेह अली खानची कव्वाली 'जी करदा है तेनू वेखे जवान' गात होतो. इरफान मला म्हणाला, अनूप, आतापासून प्रत्येक शॉटच्या आधी, काहीतरी गुणगुणत जा, त्यामुळे गोष्टी उत्तम होतात आणि इथूनच आमच्या मैत्रीला सुरुवात झाली.
'किस्सा' लिहिताना माझ्या मनात बलराज साहनी होते. तर माझ्या मनात आलेली दुसरी व्यक्ती म्हणजे इरफान खान, जो बलराज साहनी सारखा शांतपणे संवाद साधणारा व्यक्ती होता. मी इरफानच्या घरी गेलो आणि त्याला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली. संपूर्ण कथा ऐकल्यानंतर इरफान म्हणाला की ही कथा खूप वेदनादायक आहे आणि आता मला असा चित्रपट करायचा नाही.
हे ऐकल्यानंतर मी खूप निराश झालो आणि जेव्हा मी त्याच्या घरातून निघालो, तेव्हा मला वाटले की कदाचित इरफानने हा चित्रपट जसा पाहतो आहे तसा मी पाहिला नसेल. मी त्याला फोन केला की तू मला अजून दहा मिनिटे दे मला बोलायचे आहे आणि मग मी वर गेलो.
मी त्याला सांगितले की तुला कथा वेदनादायक वाटत आहे, मी समजू शकतो परंतु मला हे देखील माहित आहे की तुला नुसरत फतेह अली खानचे गाणे आवडते. त्याच्या जवळ असलेल्यांना माहीत आहे की तो जेव्हा तो गायचा तेव्हा त्याचा चेहरा लाल व्हायचा. माझे म्हणणे ऐकून इरफान मोठ्याने हसला आणि म्हणाला, चल चित्रपट करूया.
'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन मी इरफानकडे गेलो तेव्हा इरफान पुन्हा म्हणाला, अनूप, तू माझ्याकडे अशी कथा आणतोस, जी मी करू नये हे मला माहीत आहे, पण कथेसमोर मी हतबल आहे. या दोन्ही चित्रपटांदरम्यान माझ्या लक्षात आले की त्याला जीवनाकडून काहीतरी वेगळे हवे आहे.
'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' चित्रपटादरम्यान, आम्ही जैसलमेरमध्ये शूटिंग करत होतो, तेव्हा मी पाहिलं की त्या विशाल वाळवंटाचा इरफानवर खोलवर परिणाम झाला आहे. शूटिंग सुरू होण्यापूर्वीच तो आमच्यासोबत जैसलमेरला आला होता. दिवसभर तो त्या वाळवंटात एकटाच फिरायचा आणि एक-दोनदा तिथेच झोपलाही.
इरफानला पतंग उडवण्याची खूप आवड होती. जेव्हा कधी दहा मिनिटांचा ब्रेक असायचा तेव्हा तो पतंग उडवायचा आणि आम्हाला त्याला शोधायला लागायचे. एकदा मी इरफानला विचारले, तुझा पतंगाशी काय संबंध? तो म्हणाला हा नाजूक कागदाचा तुकडा हवेत उडत आहे आणि माझ्या हातात एक बारीक दोरी आहे आणि मी त्याच्याशी खेळतो आहे. आयुष्यही असंच असतं. पतंगाप्रमाणे नाजूक आयुष्याची दोरी तुमच्या हातात आहे. तुम्ही जीवनात जितके निवांत असाल, तितकेच आयुष्य आणखी उंच जाईल.
'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' या चित्रपटात इरफान उंट विक्रेत्याच्या भूमिकेत दिसत आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की इरफान उंटांना खूप घाबरत होता. मग मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासाठी पतंग नावाचा उंट शोधला. जेव्हा आम्ही हा उंट त्याच्यासमोर घेऊन गेलो तेव्हा तो थोडा घाबरला, पण काही वेळातच इरफानची उंटाशी इतका चांगली मैत्री झाली तो तासनतास त्याच्यासोबत एकटाच बसायचा. एक वेळ अशी आली की इरफान त्या उंटाशी बोलू लागला.
इरफान आणि माझे नाते वेगळे होते. एका शॉटच्या तयारी दरम्यान इरफान स्वतः तिथे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या शॉटमध्ये त्याच्यासोबत एक उंट होता आणि जशी मी शॉटची रचना केली होती, तो उंट त्या शॉटमध्ये येत नव्हता. त्या उंटाला योग्य जागी आणायला अर्धा तास लागला. संपूर्ण अर्धा तास इरफान तिथेच उभा होता. शॉट झाल्यानंतर इरफान माझ्या दिशेने आला पण काहीही न बोलता निघून गेला.
मी हे पहिल्यांदाच पाहिलं. मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारले काय झाले तुला राग आला का? तो म्हणाला, 'असं नाही अनूप, खरं तर माझी पाठ दुखतेय त्यामुळे मला उभं राहता येत नव्हतं, त्यामुळे माझा राग तुझ्यावर नाही तर माझ्यावर आहे. एक अभिनेता म्हणून मला नेहमी माझ्या दिग्दर्शकासमोर राहायचे असते आणि त्याला जे हवे असते ते करायचे असते, पण जेव्हा मी ते करू शकत नाही तेव्हा मला स्वतःचा राग येतो.
इरफान हा असा माणूस होता की त्याला प्रत्येक गोष्ट बघायला आणि वाचायला आवडत असे. त्याला कविता वाचायची आवड होती. उदय प्रकाश यांच्या हिंदीतल्या कथा वाचायला त्याला खूप आवडायचं. तो फिलॉसॉफीचा अभ्यास करायचा. याशिवाय मी त्याला भौतिकशास्त्र, इतिहास आणि गणित या विषयांची पुस्तके वाचताना पाहिले होते. जेमाझ्यासाठी खूप शॉकिंग होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.