मालकाचा विश्‍वासघात; बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेला नोकर बुलेटसह सव्वातीन लाखासह पसार

मालकाचा विश्‍वासघात; बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेला नोकर बुलेटसह सव्वातीन लाखासह पसार
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv
Published On

बीड : पैशांसाठी कोण कधी काय करेल? याचा नेम नाही. बीडमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला. मोठ्या विश्वासाने सोन्याच्या दुकानात कामाला ठेवलेल्या नोकराने मालकाला धक्का दिलाय. बँकेत (Bank) रोख रक्कम भरण्यास गेलेला नोकर रोख 3 लाख 25 हजार रुपयांसह बुलेट गाडी घेऊन पळून गेल्याचा प्रकार बीड (Beed) शहरात घडला. (Beed News Crime News)

Beed Crime News
Nandurbar: अन्‌ चोरीला गेलेली विहीर अखेर गवसली; सत्‍य आले समोर

करण महादेव मुंडे (रा. चिखलबीड, ता. वडवणी) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील फिर्यादी गणेश मैड यांच्या ज्वेलरी दुकानावर करण मुंडे हा मागील तीन आठवड्यांपासून कामाला होता. मैड यांची ट्विंकलिंग स्टार स्कूल नावाच्या 3 ठिकाणी शाळा आहेत. सदरील (School) शाळांची ट्यूशन फी व इतर माध्यमांतून प्राप्त होणारी रक्कम वैद्यनाथ बँकेत जमा केली जाते. दरम्यान 27 जुलैला शाळेची 3 लाख 25 हजार रुपयांची रक्कम काही कारणास्तव बँकेत भरता आली नसल्याने शाळेचे लिपिक महादेव येळवे यांनी ही रक्कम मैड यांच्याकडे दिली होती.

नोकर बँकेत गेलाच नाही

दुसऱ्या दिवशी मैड यांनी 3 लाख 25 हजार रुपयांची रक्कम डिपॉझिट स्लीपसह करण याच्याकडे दिली. हे पैसे बँकेत जाऊन भरण्यासाठी त्यांची बुलेट गाडीही दिली. मुंडे गाडी व रोख रक्कम घेऊन गेला तो परत आलाच नाही. मैड यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता पैसे बँकेत खात्यावर जमा केले नसल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मूळ गावी व इतर परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे गणेश मैड यांच्या तक्रारीवरून करण महादेव मुंडे याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com