Nandurbar ZP
Nandurbar ZPSaam tv

Nandurbar: अन्‌ चोरीला गेलेली विहीर अखेर गवसली; सत्‍य आले समोर

अन्‌ चोरीला गेलेली विहीर अखेर गवसली; सत्‍य आले समोर
Published on

नंदुरबार : मागील स्थायी समितीच्या सभेत ठाणेपाडा येथील आश्रमशाळेसाठीची विहीर खोदल्याची व त्यावर निधी खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत निधी आला, खर्च झाला तर मग विहीर आता गेली कुठे ? असा प्रश्‍न उपस्थित करीत विहीर चोरीस गेली का ? असा मुद्दा सभेत गाजला होता. मात्र आजच्या जिल्हा परिषद (Zilha Parishad) साधारण सभेत पुन्‍हा तो विषय आला व विहीर गवसल्याचे स्पष्ट झाले. (Nandurbar Zilha Parishad News)

Nandurbar ZP
Jalgaon: माध्‍यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेलाच खात्‍यात

ठाणेपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना (Student) पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने (Nandurbar) जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला निधी दिला होता. मात्र विहीर खोदण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे बरेच महिने तो निधी पडून होता. मात्र त्यानंतर प्रशासनाने तो निधी शासनाकडे परत पाठविला. मात्र जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या दप्तरी तो निधी विहीर खोदण्यासाठी खर्ची दाखविला गेला होता. मागील (Nandurbar ZP) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा बैठकीत विहीर गेली कुठे ? असा प्रश्‍न सदस्य देवमन पवार यांनी उचलला होता. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी श्री. बाविस्कर साऱ्यांचे टार्गेट ठरले होते.

निधी शासनाला परत

बैठकीत काही सदस्यांनी विहीर सापडली का? उपरोधिक प्रश्‍न विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत चौकशी करीत तो संबंधित विभागाचा कारकुनची चूक असल्याचे निर्दशनास आणले. तो निधी शासनाला परत गेल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर चोरीस गेलेली विहीर गवसल्याने या विषयावर पडदा पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com