जळगाव : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन आता थेट वैयक्तिक खात्यावर आणि एका तारखेला विना अडथळा वर्ग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील १४ हजार ४३ कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या पहिल्याच तारखेला या महिन्यापासून मिळणार आहे. (Jalgaon News School Employee Payment)
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांतील (School) कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे वेळेवर वेतन होण्याची मागणी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्यावतीने करण्यात येत होती. शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याने या योजनेला गती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांची खातेनिहाय माहितीतील त्रुटी पूर्तता करण्यात वेतनपथक व जेडीसीसी बँकेतर्फे (JDCC Bank) प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त, उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, वेतन पथक आणि जेडीसीसी बँकेच्या संयुक्त प्रयत्नातून सेवा हमी कायद्याचे तंतोतंत पालन करण्यात यश मिळाले आहे.
या महिन्याचे वेतन थेट खात्यात
आता यापुढे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर वेतन अदा करताना मुख्याध्यापकांच्या विवरणपत्राशिवाय शाखानिहाय पगाराची रक्कम होणार आहे. शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे, नाशिक विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, वेतन पथक अधीक्षक आर. एस. शर्मा आणि जेडीसीसी बँकेच्या या मुख्य शाखेतील अधिकारी वर्गाने थेट वेतन अदा करण्याची प्रक्रियेचा कृती कार्यक्रम निश्चित करून वेगवान हालचाली केल्याने ऑगस्ट महिन्याचे वेतन जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. पहिल्यांदाच महिन्याच्या पहिल्या तारखेला तेही थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन रक्कम वर्ग झाल्याने खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचारी सुखावले आहेत.
कर्मचाऱ्यांना दरमहा एक तारखेला वेतन अदा करण्याचा संकल्प पूर्णत्वास आला आहे. विनाअडथळा कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असल्याने एक चांगली योजना लागू झाली आहे.
- डॉ. नितीन बच्छाव, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. जळगाव
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.