प्रसूतीसाठी २ किलोमीटर पायी झोळीतून प्रवास; आईने रस्त्यातच दिला बाळाला जन्म

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव येथून एक हृदय हेलावणारी बातमी समोर आली आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam Tv
Published On

नंदूरबार: नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धडगाव येथून एक हृदय हेलावणारी बातमी समोर आली आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, पण धडगाव तालुक्यातील कुवरखेत या गावाला रस्ताच नाही. येथील एका महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी झोळीचा वापर करण्यात आले आहे. झोळीतून रुग्णालयात घेऊन जात असताना या मातेने बाळाला झोळीतच जन्म दिला आहे.

धडगाव तालुक्यातील कुवरखेत येथील रहिवासी हिरा भाईदास वळवी यांना प्रसूतीसाठी नातेवाईकांनी धडगाव ग्रामीण रुग्णालयापर्यंत (Hospital) आणण्यासाठी रस्ता नसल्याने दोन किलोमीटर झोळीतून घेऊन आणतांना मातेने रस्त्यातच बाळाला जन्म दिला आहे.

Nandurbar News
Mumbai CNG Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजी 4 रुपयांनी महाग

हृदय हेलावणारी मन सुन्न करणारी परिस्थिती पाहता. धडगाव 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर राकेश तडवी, पायलट कुंदन वळवी, संतोष पावरा यांनी झोळीतून आणताना रस्त्यातच प्रसूती झालेल्या मातेला सुखरूप आणण्यासाठी. गाडी जिथपर्यंत जाईल तिथेपर्यंत ॲम्बुलन्स नेण्याचा प्रयत्न करत. वैद्यकीय सेवा देऊन बाळाला व मातेला वीस किलोमीटर धडगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर व पायलट यांनी तात्पुरता दाखवून मातेला व बाळाला दिलेली आरोग्य सेवा कौतुकास्पद आहे.

Nandurbar News
खरी शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी

मात्र अद्यापही दुर्गम भागात रस्ते नसल्याने गरोदर मातांना व आजारी रुग्णांना झोळी करून रुग्णालयापर्यंत पोहोचवावे लागत आहे. ही येथील खासदार, आमदारांसाठी मोठी दुर्दैवाची बाब आहे. कोट्यवधींचे रस्ते कागदोपत्री तयार करून भ्रष्टाचार केला जातो. त्यामुळे इथल्या नागरिकांवर अशी वेळ येत आहे.

गरोदर मातेला झोळी करून रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागले, अशी प्रतिक्रिया आशा वर्कर फुलजा फेंदा पावरा यांनी दिली. यावेळी पिंगा कर्मा पावरा, वासू पिंगा पावरा, गुजर्या रेवा वळवी, ईश्वर चौधरी, संदीप पाडवी, लाला पावरा आदी नातेवाईक उपस्थित होते. रस्त्यातच प्रसुती झालेल्या मातेला व बाळाला 108 रुग्णवाहिकेने धडगाव रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय सेवा देत. पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com