CNG Hike
CNG HikeSaam Tv

Mumbai CNG Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजी 4 रुपयांनी महाग

मुंबईकरांना आता सीएनजीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Published on

मुंबई - आधीच महागाई मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. आता आणखी एक भर पडली आहे. पुन्हा एकदा मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे (PNG) दर वाढले आहेत. नवी दरवाढ आजपासून लागू झाल्याने मुंबईकरांना (Mumbai) आता सीएनजीसाठी (CNG) जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

हे देखील पाहा -

सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलो चार रुपयांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिन्याभरातील ही दुसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो 86 रुपये तर पीएनजीचे दर प्रति किलो 52. 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शिअल एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले, तर दुसरीकडे सीएनजी (CNG) गॅसच्या दरात वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशला लागून असलेल्या राज्यात सीएनजी आणि पीएनजी महाग झाले आहेत.

CNG Hike
Heart attack sign : हृदयविकाराचा झटका आपल्याला कानातून कसा जाणवू शकतो ? त्याबद्दल जाणून घेऊया

नागपुरात पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही सीएनजी महाग

नागपूरमध्ये पेट्रोलपेक्षा सीएनजी महाग झाले आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकलं जात आहे. सीएनजीमध्ये ६ रुपयांनी महाग झाले आहे. नागपूरात सीएनजी ११६ रुपये आहे तर पेट्रोल १०६ रुपयांनी मिळत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. सीएनजीच्या दरांतही झपाट्यानं होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com