Private bus carrying a wedding party crashes near Karanja in Gondia district, leaving one person dead and several injured.
Private bus carrying a wedding party crashes near Karanja in Gondia district, leaving one person dead and several injured.Saam Tv

लग्न समारंभातून परतत असताना भल्या पहाटे वऱ्हाडी लोकांवर काळाचा घाला; चालकाची एक चूक अन्... अपघाताची थरारक घटना

Wedding Party Bus Accident Near Gondia Karanja: गोंदिया जवळील कारंजा येथे लग्न समारंभातून परतत असताना वऱ्हाडी बसचा भीषण अपघात झाला. बस चालक ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने बस झुडपी जंगलात घुसली.
Published on

शुभम देशमुख, साम टीव्ही

गोंदिया जवळील कारंजा जवळ लग्नाची वरात घेऊन परत येत असताना खाजगी बस चा अपघात झाला असून अपघात सोनू घनश्याम उईके 27 वर्ष रा. वाडी नागपूर याचा मृत्यू झाला आहेत तर 9 लोक जखमी झाले आहे. सर्व वराती साखर झोपेत असताना झाला अपघात, बस चालकांनी ओव्हरटेक करत असताना बस चालकाचा बस वरील नियंत्रण सुटला व रोडच्या कडेला असलेल्या झाडी झुडपी जंगलात बस शिरली बस वेगात असल्यामुळे झाडी झुडपात नसलेल्या झाडांना तोडून बस काही अंतरापर्यंत चालतच राहाली मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात बसचा चुराडा झाला.

Private bus carrying a wedding party crashes near Karanja in Gondia district, leaving one person dead and several injured.
Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चोपा मोहाडी येथील वरखडे कुटुंबियातील लग्न सोहळा असून वरात ही मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी मैकेपार येथे गेली. रात्री लग्न सोहळा पार पडून परत येत असताना पहाटे पहाटे गोंदिया जवळील कारंजा येथे खाजगी बस चालक यांनी भरधाव बस ही ओव्हरटेक करत असताना समोरच्या गाडीला धडक दिली.

Private bus carrying a wedding party crashes near Karanja in Gondia district, leaving one person dead and several injured.
Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

चालकाचा बस वरील नियंत्रण सुटला आणि चालकने बसमधून उडी मारत पळ काढला असता तर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी जंगलात बस शिरली. झुडपी झाडे तोडत बस काही अंतरावर जाऊन थांबली. यामध्ये बस समोरील काच पूर्ण पणे तुटला आणि बस अनियंत्रीत होऊन अपघात झाला. यामध्ये महिला आणि काही पुरुष वर्ग तसेच लहान मूल ही बसले होते.

Private bus carrying a wedding party crashes near Karanja in Gondia district, leaving one person dead and several injured.
Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

घटनेनंतर बसमधील काही पुरुषांनी खिडकीतून लोकांना बाहेर काढले व रुग्णालयात उपचारासाठी नेले या घटनेची परिसरातील लोकांनी माहिती होताच लोकांनी धाव घेतली व लोकांना बाहेर काढले. या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com