Sakshi Sunil Jadhav
सध्या जगभरात गॅस पुरवठा होत नाहीये. त्यामुळे अनेकांची चिंता वाढत चालली आहे.
अनेकांना सर्व गॅसच्या नावांबद्दल माहिती असते, पण त्यांचा नेमका वापर आणि फरक काय आहे हे माहिती नसते. पुढे सोप्या शब्दात याची महत्त्वाची माहिती दिली आहे.
LPG म्हणजे Liquefied Petroleum Gas जो क्रूड ऑइल रिफायनिंग आणि नैसर्गिक वायू प्रक्रियेदरम्यान तयार करतात. भारतातल्या बऱ्याच घरांमध्ये स्वयंपाकासाठी या सिलिंडरचा वापर केला जातो.
LPG मध्ये प्रोपेन आणि ब्यूटेन हे वायू असतात, जे दाबाखाली द्रवरूपात सिलिंडरमध्ये भरले जातात. याचा वापर घरगुती स्वयंपाक, हॉटेल्स आणि छोटे व्यवसायांंमध्ये होतो. जिथे पाइपलाइन गॅस उपलब्ध नाही तिथे LPG वापरला जातो.
CNG म्हणजे Compressed Natural Gas, जो नैसर्गिक वायूला उच्च दाबाखाली कॉम्प्रेस करून तयार करतात. याचा वापर कार, बस, ऑटो रिक्षा यांसारख्या वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो.
CNG पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा कमी प्रदूषण निर्माण करतो, त्यामुळे हवा स्वच्छ राहते. सार्वजनिक वाहतूक आणि खासगी वाहनांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
PNG म्हणजे Piped Natural Gas, जो पाइपलाइनने थेट घरांपर्यंत किंवा उद्योगांपर्यंत पोहोचवला जातो. शहरातल्या घरांमध्ये स्वयंपाकासाठी आणि रेस्टॉरंट्समध्ये याचा वापर केला जातो.
PNG मध्ये सिलिंडर साठवण्याची गरज नसते आणि मीटरच्या मदतीने बिल भरावं लागतं. याचा वापर घरगुती स्वयंपाक, हॉटेल्स आणि उद्योगांमध्ये केला जातो.
LNG म्हणजे Liquefied Natural Gas, ज्याला –162°C तापमानाला थंड करून द्रवरूपात बदलले जातं. जहाजांद्वारे आयात करून उद्योग, वीज निर्मिती प्रकल्प आणि गॅस नेटवर्कसाठी याचा वापर केला जातो.
LPG, CNG, PNG आणि LNG हे सर्व मिळून भारताच्या गॅस अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. घरगुती स्वयंपाक, वाहतूक, उद्योग आणि वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.