Shekhar Kapoor : ११ वी नापास व्यक्तीचा मोठा कारनामा! एका तासांत लिहिली 'मिस्टर इंडिया -२'ची स्क्रिप्ट, शेखर कपूरही चकीत

Shekhar Kapoor Social Media post : सध्या 'एआय' टूलची जोरदार चर्चा होत आहे. लोक कॉम्प्युटरसारखा 'एआय' टूलचा वापर करताना दिसत आहेत. 'एआय' टूलच्या मदतीने अनेक कामे सोपे होऊ लागले आहेत.
shekhar kapoor
shekhar kapoor Saam tv

Shekhar kapoor Post :

सध्या 'एआय' टूलची जोरदार चर्चा होत आहे. लोक कॉम्प्युटरसारखा 'एआय' टूलचा वापर करताना दिसत आहेत. 'एआय' टूलच्या मदतीने अनेक कामे सोपे होऊ लागले आहेत. याचा फायदा आता प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही घेतला आहे. शेखर कपूर यांची 'एआय' टूल बाबतची एक सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आली आहे. (Latest Marathi News)

...अन् स्क्रिप्ट वाचायला दिली

शेखर कपूर यांनी पोस्ट करत म्हटलं की, '११ वी नापास घरगडीने 'एआय' टूलचा उपयोग करून एका तासांत एक स्क्रिप्ट लिहिली आहे'. शेखर कपूर यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर १८ वर्षांपासून घरगडीसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. निलेश त्यांचा चांगला मित्र आहे. निलेशने अर्ध्यात शिक्षण सोडलं. मात्र, आता त्याने 'एआय' टूलचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. या निलेशने तब्बल एका तासांत मिस्टर इंडिया-२ ची स्क्रिप्ट लिहून वाचायला दिल्याचे त्यांनी सांगितले.

shekhar kapoor
हे काय पाहावं लागतंय?, पॉर्न स्टारसोबत जाहिरात करणं Ranveer Singh ला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शेखर यांनी पुढे सांगितले की, निलेशला सकाळी ६ वाजता गुगल जेमिनीविषयी माहिती झाली. गुगल जेमिनी समजण्यास त्याला एक तास लागला. त्यानंतर त्याने ७ वाजता स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका तासांत म्हणजे सकाळी ८ वाजता स्क्रिप्ट वाचायला दिली' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेखर यांनी पुढे म्हटले की, 'एआय'चं जग ही नवी क्रांती आहे. 'एआय' टूल हे निलेश सारख्या लोकांसाठी वरदान आहे. निलेश ११ वी नापास असूनही 'एआय'च्या माध्यमातून एक वेगळी ओळख बनवू शकतो'.

तत्पूर्वी, गेल्या वर्षी हॉलीवूडचे अनेक स्क्रिप्ट लेखक, अभिनेत्यांनी 'एआय' टूलचा वापर करण्यावर आक्षेप नोंदवला होता. त्याच्याविरोधात संपही केला होता.

shekhar kapoor
Janhvi Kapoor चा भाव वाढला! आणखी एका साऊथ चित्रपटात मिळालं काम, मानधनातही केली वाढ

फक्त हॉलीवूडचं नाही तर महानायक अमिताभ बच्चन यांचंही म्हणणं आहे की, 'एआय' टूल कोणत्याही अभिनेत्याचा आवाज आणि चेहऱ्याची मॅपिंग करून त्याची कॉपी करण्यास यशस्वी होत आहे. आता तो दिवस दूर नाही की, आता कलाकारांच्या ऐवजी 'एआय' टूलचा वापर होईल'.

मिस्टर इंडियाचा सिक्वल कधी येणार?

शेखर कपूर यांनी मिस्टर इंडियाच्या सिक्वलवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मिस्टर इंडियाच्या सिक्वलबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com