हे काय पाहावं लागतंय?, पॉर्न स्टारसोबत जाहिरात करणं Ranveer Singh ला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ranveer Singh Advertisement With Johnny Sins: रणवीर सिंग त्याच्या नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. ही जाहिरात करणं त्याला चांगलेच महागात पडले आहे. कारण नेटकरी त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.
Ranveer Singh Trolled
Ranveer Singh TrolledSaam Tv

Ranveer Singh Trolled:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर सिंग आपल्या अभिनयाने लोकांचे मनोरंजन करतो खरा. पण तो त्याच्या ड्रेसिंग स्टाइलसोबत त्याच्या चांगल्या स्वभावामुळे चर्चेत असते. चाहते रणवीर सिंगच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या रणवीर सिंग त्याच्या नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. ही जाहिरात करणं त्याला चांगलेच महागात पडले आहे. कारण नेटकरी त्याला प्रचंड ट्रोल (Ranveer Singh Trolled) करत आहेत.

रणवीर सिंगने अमेरिकन पॉर्नस्टार जॉनी सिन्ससोबत (Johnny Sins) एक जाहिरात शूट केली आहे. पण त्याची ही नवी जाहिरात प्रेक्षकांना अजिबात आवडली नाही. या जाहिरातीवरून ते त्याला ट्रोल करत आहेत. रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याची नवीन जाहिरात शेअर केली असून लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. रणवीर सिंगच्या या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत...

रणवीर सिंगने बोल्ड केअरची जाहिरात शूट केली आहे. या जाहिरातीत रणवीर सिंगसोबत अमेरिकन पॉर्न स्टार जॉनी सिन्स दिसत आहे. या जाहिरातीचा व्हिडिओ रणवीर सिंगने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. रणवीर सिंग आणि जॉनी सिन्सला एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत.

एका यूजरने कमेंट्स करत लिहिले आहे की, 'जाहिरात बनवायलाही मर्यादा असते.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'हे काय पाहावं लागतंय?' तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'रणवीर सिंगला काम मिळत नाही म्हणून त्याला पॉर्न स्टार्ससोबत काम करावे लागले.' आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे.' रणवीर सिंगला जरी ट्रोल केले जात असले तरी देखील त्याची ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ranveer Singh Trolled
गोव्यामध्ये होणार Rakul Preet Singh आणि Jackky Bhagnani यांचे ग्रँड वेडिंग, लग्नाची पत्रिका व्हायरल

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो 'डॉन 3' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. फरहान अख्तर 'डॉन 3' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'डॉन 3' या चित्रपटाव्यतिरिक्त रणवीर सिंग 'सिंघम अगेन' चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. रणवीर सिंग शेवटी 2023 साली प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसला होता.

Ranveer Singh Trolled
शाहिद- क्रितीच्या 'Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya' ला विकेंडचा जबरदस्त फायदा, तिसऱ्या दिवशीही केली इतकी कमाई?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com